भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांना कोरोना

chandrashekhar bawankule
chandrashekhar bawankulechandrashekhar bawankule

नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोमवारी (ता. २४) कोरोनाची लागण झाली. यानंतर भाजपचे विधान परिषदेचे आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनीही कोरोनाची लागण (corona positive) झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. नेत्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याचे यानिमित्त पाहायला मिळत आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (corona positive) आली आहे. मी स्वतःला घरीच आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधोपचार व काळजी घेत आहे. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी चाचणी करून घ्यावी, अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी ट्विटद्वारे (tweet) केली आहे.

नाना पटोले यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधल्यानंतर चांगलेच वादंग पेटले होते. यामुळे राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात चंद्रशेखर बावनकुळेही (chandrashekhar bawankule) सहभागी झाले होते. आंदोलनात नागरिक व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी त्यांना कोरोनाची लागण (corona positive) झाली असावी असा अंदाज लावला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com