‘अमरावतीचे नाव बदनाम करू नका’; यशोमती ठाकुरांचा टोला कुणाला?

अमरावती शहरात नको त्या गोष्टींचे राजकारण का सुरू आहे
yashomati thakur
yashomati thakuryashomati thakur

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati shivaji maharaj) यांचा पुतळा महापालिकेने हटवल्यानंतर अमरावतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. एकमेकांवर आरोप करण्यापासून निवडणुकीत जागा दाखवून देण्याची भाषा वापरण्यात आली होती. राणा दाम्पत्यांनी पुतळा हटवल्याचे खापर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर फोडले होते. अमरावती शहरात नको त्या गोष्टींचे राजकारण का सुरू आहे. माझी सर्वांना विनंती आहे, अमरावतीचे नाव बदनाम करू नका, असा अप्रत्यक्षरीत्या टोला राणा दाम्पत्यावर यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी ट्विटद्वारे हाणला.

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने येथील राजापेठ उड्डाणपुलावर बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati shivaji maharaj) मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आला होता. यामुळे रविवारी सकाळपासून वातावरण चांगलेच तापले होते.

पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या सांगण्यावरून पालिकेने पुतळा हटवल्याचा आरोप रवी राणा आणि नवनीत राणा यांनी केला होता. मंगळवारी दुपारी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या समर्थकांनी महिला व बालविकास मंत्री आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा पुतळाही जाळला होता. यानंतर युवक कॉंग्रेसने तिवसा येथील पेट्रोल पंप चौकात राणा दाम्पत्याचा पुतळा जाळला होता.

yashomati thakur
...तरीही ते केंद्रात मंत्री कसे होतात; पाटील यांचा पवारांना टोला

मात्र, यशोमती ठाकूर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. तिवसा नगरपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर त्यांनी एक ट्विट केले. ‘अमरावतीचे नाव देशात शिक्षण, उद्योग, रोजगार, संस्कृतीसाठी ओळखले जाते. या शहरात नको त्या गोष्टींचे राजकारण का सुरू आहे. माझी सर्वांना विनंती आहे, अमरावतीचे नाव बदनाम करू नका’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी कोणाचेही नाव न घेता राणा दाम्पत्यांवर टोला हाणल्याचे म्हणता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com