CM Devendra Fadnavis : एकही व्यक्ती हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही : मुख्यमंत्री , ‘सर्वांसाठी घर’बाबत शासन कटिबद्ध
Nagpur News : नागपूर शहरातील झोपडपट्टीवासीयांना घराचा हक्क देण्यासाठी पट्टे वाटप मोहीम राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनता दरबारात झोपडपट्टीधारकांना थेट पट्टे वितरित केले.
नागपूर : शहरात स्वतःच्या मालकीचे घर असावे अशी हजारो झोपडपट्टीवासीयांची इच्छा आहे. त्यांना पट्टे वाटपाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळत आहेत. त्यामुळे निकषाची पूर्तता करणारी एकही व्यक्ती हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही.