नागपूर : सनदी अधिकाऱ्यांना पुरस्कारासाठी आचारसंहिता

शासनाची लागणार मंजुरी : संस्थेची द्यावी लागणार माहिती
आचारसंहिता
आचारसंहिता sakal

नागपूर : सनदी अधिकाऱ्यांना पुरस्कार स्वीकारण्यावर शासनाने आचारसंहिता लावली आहे. त्यामुळे पुरस्कार स्वीकारण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांना शासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक झाले आहे. अधिकाऱ्यांना कुणालाही पुरस्कार देता येणार नाही वा स्वीकारताही येणार नाही. विविध सामाजिक संस्थांकडून सनदी अधिकाऱ्यांना पुरस्कार देण्यात येतात. काही जण वा संस्था अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन कामे करून घेतात. अशी काही प्रकरणे शासनाच्या निदर्शनास आली आहेत.

काही ठिकाणी शासनाला विरोध करणाऱ्या संस्थांकडून पुरस्कार दिल्याचे आढळून आले. यामुळेच शासनाने सनदी अधिकाऱ्यांना पुरस्कार स्वीकारण्यासह सभा, समारंभात सहभागी होण्यावर निर्बंध घातले आहेत. आता सनदी अधिकाऱ्यांना पूर्व परवानगीशिवाय दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभात सहभागी होता येणार नाही तसेच प्रशस्तीपत्र स्वीकारता येणार नाही. या संहितेचे उल्लंघन करणाऱ्यांच्या सेवेवर परिणाम होणार आहे.

आचारसंहिता
जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

कुठलाही पुरस्कार स्वीकारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला परवानगी घ्यावी लागणार असून त्यासाठी १५ दिवसांपूर्वी अर्ज करावा लागेल. यात पुरस्कार देणारी संस्था, व्यक्तीची सर्व माहिती द्यावी लागेल. या अर्जाचा विचार होऊन शासनाच्या परवानगीनंतरच अधिकाऱ्याला पुरस्कार स्वीकारता येणार आहे.

महत्त्वाच्या अटी

  • पुरस्कार देणाऱ्या संस्था, व्यक्ती अराजकीय असाव्या.

  • संस्थेचा राज्य व राष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक असावा.

  • संस्थेचे कार्य शासनाच्या प्रचलित धोरणांच्या विरोधात नसावे.

  • संस्था नोंदणीकृत असावी, पदाधिकाऱ्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नसावी.

  • पुरस्कार देणारी संस्था, व्यक्तीचा कार्यालयाशी संबंध आला का किंवा येणार आहे का, याची माहिती देणे आवश्यक.

  • नामांकित व प्रतिष्ठित संस्थेकडील पुरस्कार स्वीकारता येतील. त्यासाठी अर्ज करावा लागेल.

  • प्रशस्तीपत्र किंवा सन्मानचिन्ह स्वरूपात पुरस्कार स्वीकारता येईल.

  • सोने, चांदी, रोख रक्कम स्वीकारता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com