१५ जूनपर्यंत पाऊस बरसणार, सात दिवसांत पूर्वतयारीची कामे करण्याच्या सूचना

monsoon
monsoone sakal

नागपूर : येत्या १५ जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस (monsoon rain) बरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ३१५ वर्षांतील सर्वांत मोठ्या पुराला अनुभवलेल्या नागपूर जिल्ह्याने येत्या मॉन्सूनसाठी अतिशय गंभीरतेने तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी यासंदर्भात झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या (district administration) मॉन्सूनपूर्व बैठकीत (pre monsoon meeting) कोरोना संसर्ग आणि गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन जिल्ह्यातील पुराचा धोका असणाऱ्या सर्व ३४१ गावांना कोणताही धोका पोहोचणार नाही, अशा पद्धतीचे सुसज्ज नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे (collecor ravindra thakre) यांनी दिले. (collector order to complete pre monsoon work in nagpur)

monsoon
सहा महिन्यापासून रेशनच्या धान्यासाठी 'त्यांची' वणवण; अधिकारी देतात सतत हुलकावणी

गेल्यावर्षी २८ व २९ ऑगस्टला मध्यप्रदेशातील चौराई धरणाच्या ग्रहण क्षेत्रात काही तासांमध्ये ४१४ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे चौराई धरणातून ९८ टक्के भरलेल्या तोतलाडोह धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तोतलाडोहचा विसर्ग वाढविणे आवश्यक असल्याने गेल्या ३१५ वर्षांत आला नसेल इतका भयानक पूर नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी, मौदा, सावनेर तालुक्याने बघितला. यात मात्र प्रचंड वित्तहानी झाली. त्यामुळे यावर्षी मॉन्सूनपूर्व तयारी करताना गेल्या वर्षी जे घडले, ते पुन्हा घडणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन करण्याची सूचना बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश -

  • बोटी, लाईफ जॅकेट, प्रशिक्षित मनुष्यबळ, यंत्रसामुग्री तपासून तयार ठेवा.

  • कोरोनासह अन्य संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायोजना करा.

  • वीज पडून मृत्युमुखी पडणार नाही, यासाठी जनजागृती मोहीम राबवा.

  • सर्व मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्प व जिल्ह्यातील तलावांचे परीक्षण करा.

  • जिल्ह्यातील संपूर्ण ३४१ गावांमध्ये आवश्यक संपर्क यंत्रणा व सतर्कता ठेवा.

  • अर्धवट पूल व अर्धवट रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी फलक लावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com