नाही स्वःची तर दुसऱ्याची तर चिंता करा; मेडिकलमधूनच पळाला कोरोनाबाधित

Corona positive patient escaped from medical Nagpur corona news
Corona positive patient escaped from medical Nagpur corona news

नागपूर : मेडिकलच्या कोविड वॉर्डातून शनिवारी (ता. १३) सकाळी ७ वाजता कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण पळाला. यामुळे एकच खळबळ उडाली. दुसऱ्या कोरोनाबाधिताच्या नातेवाइकाचा पाठलाग करीत तो वॉर्डातून बाहेर पडला. तो मेडिकलधील कोरोनाबाधित असल्याचे कळताच चिचभवन परिसरातील नातेवाइकाच्या घरी एकच गलका झाला. रुग्णाचा भाऊ त्याला पुन्हा कोविड रुग्णालयात घेऊन आला. यानंतर मेडिकलमधील अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पलायन केलेला २७ वर्षीय कोरोनाबाधित वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरातील आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी एका अपघातात त्याच्या मेंदूला इजा झाली. मेडिकलमध्ये उपचार करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच काही दिवसांनी त्याला कोरोनाची लक्षणे आढळली. खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र चाचणीत कोरोना असल्याचे निदान झाले.

दरम्यान, मेंदूला झालेल्या इजेमुळे त्याला बोलण्यास अडचण येऊ लागली. स्मरणशक्तीवरही परिणाम झाला. नातेवाइकांनी त्याला मेडिकलच्या कोविड वॉर्डात दाखल केले. दरम्यान, शनिवारी सकाळी एका रुग्णाला भेटून नातेवाईक परत जात होते. या नातेवाइकाचा पाठलाग करत तो थेट चिचभवन परिसरापर्यंत पोहोचला. तो तिथे कसा पोहोचला याचा थांगपत्ता कुणाला लागला नाही. 

एका नातेवाइकाचे लक्ष गेले. त्याने त्याच्याकडील कागदपत्रे बघितली. त्याच्या भावाचा मोबाईल क्रमांक मिळविला. तुमचा भाऊ चिचभवन परिसरात असल्याचे त्यांना कळवले. मात्र, यादरम्यान तो त्यांच्यासोबत चहा-बिस्कीट खात होता. त्याच्या भावाने चिचभवन परिसर गाठत त्याला परत मेडिकलमध्ये दाखल केले. त्यापूर्वी मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिल्यावर त्याचा शोध सुरू झाला होता. मात्र, तब्बल सात तासांनंतर तो पुन्हा मेडिकलमध्ये दाखल झाला.

मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमधून यापूर्वीही दोन कोरोनाबाधितांनी पळ काढला होता. दोघांनाही वेळीच नातेवाइकांसह पोलिसांच्या मदतीने गाठले होते. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये आणण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. रुग्ण पळाल्याची ही मेडिकलधील तिसरी घटना आहे. यामुळे मेडिकलमधील सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com