आठवड्यात एकही कोरोनाबळी नाही; नवे नऊ बाधित

आठवड्यात एकही कोरोनाबळी नाही; नवे नऊ बाधित

नागपूर : गेल्या आठवडाभर जिल्ह्यात एकही कोरोनाबळी आढळून आला नाही. आज नव्या नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. दरम्यान २० जणांनी आज कोरोनावर मात केली. (Coronavirus-No-Death-Last-Week-nad86)

जिल्ह्यात शेवटचा कोरोनाबळी १५ जुलैला आढळून आला होता. त्यानंतर १६ ते आज २३ जुलैपर्यंत एकही कोरोना बळी आढळून आला नाही. त्यामुळे आठवड्याभरापासून बळींची एकूण संख्या १० हजार ११५ वर असल्याने प्रशासनाला तूर्तास मोठा दिलासा मिळाला. दरम्यान आज जिल्ह्यात नऊ नवे बाधित आढळून आले.

यात शहरातील आठ तर ग्रामीणमधील एकाचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ४ लाख ९२ हजार ८०४ पर्यंत पोहोचली. यात शहरातील ३ लाख ३९ हजार ९३६ तर ग्रामीण भागातील १ लाख ४६ हजार ६६ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ६ हजार ८०२ जण आतापर्यंत बाधित आढळून आले.

आठवड्यात एकही कोरोनाबळी नाही; नवे नऊ बाधित
वावर आहे तर पॉवर आहे : तीन भाऊ, तीन एकर अन् लाखोंची उलाढाल

दरम्यान, आज २० जणांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील १८ तर ग्रामीणमधील दोघांचा समावेश आहे. एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४ लाख ८२ हजार ४३३ पर्यंत पोहोचली. जिल्ह्यात सद्यस्थितीत २५६ सक्रीय रुग्ण आहेत. यात शहरातील १९६ तर ग्रामीणमधील ५२ जण आहेत.

(Coronavirus-No-Death-Last-Week-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com