Positive story : हिंमत, इच्छाशक्तीने जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई

Positive story : हिंमत, इच्छाशक्तीने जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई

नागपूर : हिंमत, संयम, इच्छाशक्ती व एकमेकांची साथ असेल तर भल्या भल्या संकटांवर चुटकीसरशी मात करता येते. सोनेगाव परिसरात राहणाऱ्या वरटकर परिवाराने ते सिद्ध करून दाखविले. ८७ वर्षीय आजीसह कुटुंबातील पाचही सदस्य कोरोनाच्या (coronavirus) तावडीत सापडले होते. मात्र, हार न मानता सर्वांनी घरीच उपचार घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली. तब्बल २५ दिवसांच्या कठीण संघर्षानंतर मिळविलेला हा विजय परिवारासाठी सुटकेचा अनुभव देणारा होता. (Courage, willpower won the battle against Corona)

नागपूर दूरदर्शनमधून निर्माता म्हणून सेवानिवृत्त झालेले व सध्या राजकारणे मीडियामध्ये प्रोग्राम हेड म्हणून कार्यरत असलेले उमाकांत वरटकर यांच्या परिवारात वृद्ध आईसह पत्नी, आयआयटी मुंबईत शिक्षण घेत असलेला मुलगा (गौरव) आणि नामांकित कंपनीत ‘जॉब’ करीत असलेली मुलगी (शिवानी) असे पाच जण आहेत.

Positive story : हिंमत, इच्छाशक्तीने जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई
वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

एकेदिवशी उमाकांत यांना हलका ताप व सर्दीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी लगेच डॉक्टर मित्र डॉ. संजय चौधरी यांना फोन करून सल्ला घेतला. तीन-चार दिवसांनंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर कुटुंबातील इतरही सदस्यांना हळूहळू कोरोनाची लक्षणे दिसू लागली. परिवारातील सर्वच सदस्य एकाचवेळी पॉझिटिव्ह आल्याने साहजिकच ते थोडे घाबरले. मात्र, हार मानली नाही.

एकमेकांना हिंमत देत पाचही जणांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेत या संकटावर मात केली. ८७ वर्षांची म्हातारी आई असूनही ती लवकर बरी झाली. मात्र, मुलाला आजारातून रिकव्हर व्हायला खूप वेळ लागला. दहा दिवस होऊनही त्याचा ताप उतरत नव्हता. शिवाय खोकला आणि श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यामुळे सिटी स्कॅन व रक्ताची चाचणीदेखील करावी लागली. अखेर २५ दिवसांच्या उपचारानंतर तोसुद्धा कोरोनामुक्त झाला.

Positive story : हिंमत, इच्छाशक्तीने जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई
धक्कादायक माहिती : दिवसाला सरासरी २५ चिमुकले कोरोनाबाधित

घाबरलो पण हिंमत हारलो नाही

चार आठवड्यांचा काळ आमच्यासाठी खूपच भयानक व परीक्षा घेणारा होता. थोडे घाबरलो जरी असलो, तरीपण हिंमत हारलो नव्हतो. डॉक्टर, मित्र व नातेवाइकांनी वेळोवेळी धीर दिल्यामुळे पाचही जण ही जीवघेणी लढाई जिंकण्यात यशस्वी ठरलो. घाबरून न जाता सकारात्मक राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लवकर चाचणी व योग्य उपचार केल्यास कोरोनासारखा गंभीर आजारही तुमचे काहीच बिघडवू शकत नाही, असे उमाकांत म्हणाले.

(Courage, willpower won the battle against Corona)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com