आयटीआयचे स्कील वापरले चोरीत; सहा अट्टल चोरट्यांना अटक

आयटीआय करुन मिळालेल्या ज्ञानातून स्वतःचा व्यवसाय वा कुठेतरी चांगले काम करण्याऐवजी त्याचा वापर करीत, चक्क वाहनचोरी आणि घरफोडीसाठी वापरत असलेल्या युवकासह सहा जणांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक
crime in india ITI skill used in theft Six thieves arrested nagpur
crime in india ITI skill used in theft Six thieves arrested nagpur sakal

नागपूर : आयटीआय करुन मिळालेल्या ज्ञानातून स्वतःचा व्यवसाय वा कुठेतरी चांगले काम करण्याऐवजी त्याचा वापर करीत, चक्क वाहनचोरी आणि घरफोडीसाठी वापरत असलेल्या युवकासह सहा जणांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. निखिल ज्ञानेश्वर पुडके (वय २०, रा. मौदा), तेजस ज्ञानेश्वर झाडे (वय २१, रा. मौदा), भावेश किशोर जुनघरे (वय १८, रा. कामठी), पीयूष अजय मस्के (वय १९, रा. कामठी), मयुर मोरेश्वर भोयर (वय १९, रा. वडोदा, कामठी) आणि सुयश दिवाकर भिसेकर (वय १९, रा. वडोदा, कामठी) अशी आरोपींची नावे आहेत. निखिल हा मुख्य आरोपी असून त्याचावर वाहनचोरीसह घरफोड्याही करतो.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाहन चोऱ्यांच्या घटना घडत होत्या. यामुळे पोलिस अधीक्षक विजय मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्त्वात एक विशेष पथक तयार केले. पोलिसांनी गुप्तमाहिती मिळाली की, नागपूर कोलकाता महामार्गावरील चौधरी ढाब्याच्या मागील मोकळ्या जागेत ही चोरीची वाहने ठेवण्यात आली असून ती विक्रीसाठी नेली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी सहा जणांना अटक करण्यात आली. आरोपी निखील यांच्याकडे सोन्याचे दागिने मिळाले. हे त्याने त्याच्या अन्य एका साथिदाराच्यासोबतीने केलेल्या घरफोडीत मिळाल्याचे त्याने कबूल केले आहे.

आरोपींकडून चोरीच्या १६ मोटरसायकल आणि गुन्ह्यात वापण्यात आलेल्या २ मोटर सायकल अशा एकूण १८ मोटर सायकली आणि दोन घरफोडीच्या गुन्ह्यांमधील दागिने असा एकूण १३ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

असा करायचा ज्ञानाचा उपयोग

निखिलने यांत्रिकी शाखेतून आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे त्याला यंत्रांची चांगली समज आहे. मूळ किल्ली किंवा बनावट किल्लीशिवाय थेट कनेक्शन तोडून गाडीचे कुलूप तोडण्याचे तंत्र त्याला अवगत होते. दरम्यान त्याने युट्यूबच्या माध्यमातून वाहनांचे कनेक्शन थेट कसे करता येईल याची माहिती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com