Crime : 'त्या’ तीन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल; आगीत होरपळून झाला मृत्यू

Crime
CrimeSakal

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत सोनगाव निपानी परिसरात असलेल्या मे. कटारिया ॲग्रो प्रा. लिमिटेडच्या कंपनीत २४ एप्रिलला लागलेल्या आगीत तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांनी कारखान्यात आवश्‍यक त्या सोयी-सुविधा न ठेवल्याने त्यांच्यावर एमआयडीसी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

भारत मनहरलाल कटारिया, दिशांत भारत कटारिया (दोन्ही रा. सलासर अपार्टमेंट, लेन्ड्रा पार्क, रामदासपेठ) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी सोनेगाव निपानी या परिसरात असलेल्या मे. कटारिया ॲग्रो प्रा. लिमिटेडच्या कंपनीत अचानक आग लागली. त्यामुळे येथे काम करणारे काही मजूर आत अडकल्याची माहिती मिळाली.

कंपनीचे व्यवस्थापक योगपाल भारत गणविर यांनी याबाबत सूचना अग्निशमन विभाग आणि पोलिसांना दिली. या आगीत धनेंद्र दसाराम आगासे (वय ३६), विकास जगदेवकुमार मरावी (वय २३), सरिताकुमार ज्ञानचंद्र मरावी (वय १९) हे जखमी झाले होते. याशिवाय आग विझवित असताना, हेमराज चंदुसिंग आर्मो, आदेश अशोक दहिवले आणि अनुरोध सुखचैन मरावी या तिघांचा जळून मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती.

३५ तासानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासास सुरुवात केली. त्यातून कंपनीत जाण्याकरिता एकच दार असून तिथे वेंलिटेशनसाठी वेंटीलेटरही लावलेले नाहीत.

मशीनच्या भोवताली कच्चा माल पडलेल्या अवस्थेत आढळला. येथे बसविण्यात आलेल्‍या इलेक्ट्रिक पॅनलमध्ये स्फोट झाल्याने कच्चा मालाला ही आग लागल्याने घटना घडल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे कुठलीही साधने वापरण्यात येत नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण चौकशीअंती भारत मनहरलाल कटारिया, दिशांत भारत कटारिया या दोन्ही संचालकांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com