Nagpur Crime news : प्रेयसीच्या आईने बोलू दिलं नाही म्हणून प्रियकराचा चाकूहल्ला, अल्पवयीन जोडपे फरार Crime news nagpur Kapilnagar girlfriend mother Knife attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime Case

Nagpur Crime news : प्रेयसीच्या आईने बोलू दिलं नाही म्हणून प्रियकराचा चाकूहल्ला, अल्पवयीन जोडपे फरार

नागपूर : अल्पवयीन मुला-मुलीचे एकमेकांवर प्रेम जडले. मात्र, हे प्रेयसीच्या आईला कळताच तिने मुलीला त्याच्याशी न भेटण्याची तंबी दिली. त्यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन प्रियकराने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या आईवर चाकूहल्ला केला. ही खळबळजनक घटना कपिलनगर पोलिस हद्दीत घडली.

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन रोनेल (बदललेले नाव) आणि जास्मीन (वय १४ बदललेले नाव) यांचे एकमेकांवर प्रेम होते. ते एकमेकांना भेटू लागले. ही बाब जास्मीनच्या आईला कळली. तिने जास्मीनला मुलाशी बोलणे बंद करण्यास सांगितले. काही दिवसांनी तिला नातेवाईकांकडे राहण्यासाठी पाठविले. ही बाब रोनेलला कळली. त्यामुळे तो भडकला. त्याने शनिवारी (ता.२७) रात्री जास्मीनचे घर गाठले.

प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या आईवर चाकूहल्ला

जास्मीनच्या आई-वडिलांना जिवानिशी मारण्याची धमकी दिली. त्यावेळी ते एका कार्यक्रमाला जात होते. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे रोनेल अधिकच संतापला. तेव्हा सोबत आलेला साहिल याने चाकूने जास्मीनच्या आईवर हल्ला करीत, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोनेलने त्याला अडवित घराची तोडफोड केली. त्यांना पुन्हा धमकी देत, ते दोघेही पसार झाले. शेजाऱ्यांनी त्यांना दवाखान्यात नेले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिननगर पोलिसांनी साहिलसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.