crime police who extorted and threatened Union Minister Nitin Gadkari wanted to become don nagpur
crime police who extorted and threatened Union Minister Nitin Gadkari wanted to become don nagpur esakal

Crime News : डॉन होण्यासाठी धमकी योगेश पुजारीचा पोलिसांकडे खुलासा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणी आणि धमकी देणाऱ्या जयेशला डॉन व्हायचं

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणी आणि धमकी देणाऱ्या जयेशला डॉन व्हायचं असल्यानेच त्याने नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. जयेश पुजारी ऊर्फ कांथा हा सध्या धंतोली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या कोठडीत पोलिसांनी शुक्रवारी पुन्हा तीन दिवसांची वाढ मिळविली आहे.

बेळगाव येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जयेश पुजारीने जानेवारी महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला कार्यालयात तीनदा फोन करून त्यांना उडवून देण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा काही दिवसांपूर्वी त्याने दोन वेळा फोन करीत दहा कोटी रुपयांची मागणी केली होती.

त्यानंतर धंतोली पोलिसांनी त्याला बेळगाव कारागृहातून ‘प्रोडक्शन वॉरन्ट’वर नागपुरात आणले. चौकशीदरम्यान त्याचा वेगवेगळ्या साक्षीमुळे पोलिसही हैराण झाले आहे. ‘‘कधी महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक तर कधी लक्ष वेधण्यासाठी फोन केल्याचे तो सांगतो.

मात्र, आता त्याने चक्क डॉन म्हणून नावारूपास येण्यासाठीच नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचा नवा खुलासा केला आहे. जयेशच्या वारंवार बदलत असलेल्या साक्षीमुळे धंतोली पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला आज पुन्हा वाढीव कोठडीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले. यावेळी न्यायालयाने जयेशच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे.

जयेश खेळतोय मानसिक खेळ

कारागृहात राहून जयेशने सगळेच डावपेच शिकला असल्याने तो पोलिसांसोबत मानसिक खेळ खेळत असल्याचे समजते. त्याच्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी पोलिसही काळजीपूर्वक आणि सावधगिरीने त्याची चौकशी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठीच वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस आयुक्तही त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचे दिसत आहेत.

पोलिस आयुक्तांनीही केली चौकशी

जयेश वारंवार आपली साक्षीमध्ये बदल करीत असताना काल खुद्द पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याची चौकशी केली. यावेळी त्याने प्रसिद्ध होण्यासाठी हा बनाव केल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com