ॲमेझॉनमध्ये नोकरीच्या नावावर युवकाला गंडविले

लिंकच्या माध्यमातून साडेतीन लाखांनी फसवले
crime update fraud with Young man job Amazon nagpur
crime update fraud with Young man job Amazon nagpur Google

नागपूर : अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विश्‍वकर्मानगर परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय युवकाची मोबाईलमध्ये आलेल्या लिंकमधून ॲमेझॉनमध्ये नोकरीची संधी देण्याच्या नावावर ३ लाख ६० हजारांनी फसवणूक केली. ही घटना १७ ते २३ मार्चदरम्यान घडली. कृणाल गोविंदराव तेलरांधे (वय २२) असे युवकाचे नाव आहे. १७ तारखेला तो ॲमेझॉनवर सर्च करीत असताना त्याला एक व्हॉट्सॲप मॅसेज आला. त्यात ॲमेझॉन प्रॉडक्टची नोकरी करीत, दररोज २ ते ५ हजार कमावण्याची संधी मिळेल, असे सांगण्यात आले.

एक लिंक पाठवित त्यामध्ये दिलेले टास्क पूर्ण केल्यास बोनस पैसेही मिळतील असे सांगितले. त्यातून कृणालने ती लिंक उघडत टास्क पूर्ण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला प्रथम १०० आणि दुसऱ्यांदा १४० रुपये अधिकचे खात्यात दिसले. मात्र, त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी ८०० रुपये, ११०० आणि तीन हजार रुपयाचा टास्क पूर्ण केला. मात्र, बॅंकेतून पैसे निघत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे व्हॉट्सॲप मॅसेजच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा पैसे जमा करण्यास सागून त्याच्याकडून ३ लाख ६० हजार उकळले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com