पावसाळी सहल जीवावर बेतली; खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू

पावसाळी सहल जीवावर बेतली; खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू

नागपूर : पावसाची मजा घेण्यासाठी गेलेले तीन मित्र शेततळ्यासारख्या खड्ड्यात पडले. त्यांची आरडाओरड ऐकून शेजारचा सुरक्षा रक्षक धावून आला. त्याने कसेबसे दोघांना बाहेर काढून जीवदान दिले. पण, चिखलामुळे तिसऱ्याला बाहेर निघता आले नाही. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी वाठोड्यातील जयस्वाल इंडस्ट्रीज परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. (Death-of-a-child-drowning-in-a-pit-success-in-rescuing-both)

उमेद उल्ला सलीम खान (वय १५, रा. सुमितनगर) असे मृताचे नाव आहे. त्याचे दोन मित्र ताजबाग परिसरातील रहिवासी आहेत. गुरुवारी दुपारनंतर शहरात पावसाला सुरुवात झाली. तिघांनी मिळून पावसाची मजा घेण्यासाठी जवळच्या शेत शिवारात फेरफटका मारण्याचा आणि फोटो काढण्याचा बेत आखला. तिघेही वाठोड्यातील जयस्वाल इंडस्ट्रीज एरीया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात गेले. या भागात लिंबाची बाग, झाडेझुडपे असण्यासह जयस्वाल शाळेजवळ शेततळ्यासारखा खड्डाही आहे.

पावसाळी सहल जीवावर बेतली; खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू
वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, आईने फोडला टाहो

पावसामुळे त्यात पाणी जमा झाले आहे. सुरक्षेसाठी या भागात काटेरी कुंपण टाकण्यात आले आहे. यानंतरही तिन्ही मुले आत शिरली. मनसोक्त हुल्लडबाजी केल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास माती व शेणाने भरलेले पाय धुण्यासाठी तिघेही पाण्याने भरलेल्या खड्याजवळ गेले. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.

यामुळेच सर्वत्र चिखल असूनही ते खड्ड्यातील पाण्याने पाय धुण्याचा प्रयत्न करीत होते. तिघेही तोल गेल्याने पाण्यात पडले. मदतीसाठी आरडाओरड करताच जवळच असलेला सुरक्षारक्षक मदतीला धावून आला. त्याने प्रयत्नाची पराकाष्ठा करीत दोन मुलांना बाहेर काढले. उमेद मात्र गाळात फसला. पाहता पाहता तो पाण्यात बुडाला. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

(Death-of-a-child-drowning-in-a-pit-success-in-rescuing-both)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com