esakal | सट्टेबाजांनी मंत्र्यांची पूजा केली तर नवल वाटायला नको, वडेट्टीवारांच्या व्हिडिओवरून फडणवीसांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

devendra fadnavis

'सट्टेबाजांनी मंत्र्यांची पूजा केली तर नवल वाटायला नको'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : चंद्रपुरातील दारूबंदी (lift liquor ban chandrapur ) उठविल्यानंतर ५ जुलैला सर्व बार आणि दारूची दुकाने सुरू झाले. त्यानंतर एका बार मालकाने चक्क मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (minister vijay wadettiwar यांचा फोटो बारमध्ये लावला आणि त्याची पूजा देखील केली. त्यावरूनच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला आहे. (devendra fadnavis on vijay wadettiwar and bar owner video in nagpur)

हेही वाचा: संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात? शिवसेना मंत्र्याचं सूचक विधान

या मंत्रांच्या बाबतीत असेच होणे अपेक्षित आहे. उद्या जर सट्टेबाजांनी मंत्र्यांची पूजा केली तर काही नवल वाटायला नको, असे गंभीर टीका फडणवीसांनी केली. दरम्यान, त्यांनी मध्यावती निवडणुकांच्या बाबतही भाष्य केले. मध्यावती होईल की नाही याचा निर्णय सरकारला करायचा आहे. मात्र, ते तशी हिम्मत करणार नाही. कारण त्यांना माहित आहे निवडणूक झाली तर ते हरणार आहेत. या सरकारविरोधात लोकांमध्ये खूप नाराजी आहे, असेही ते म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण?

भाजप सरकारच्या काळात 1 एप्रिल 2015 रोजी चंद्रपुरात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतर अवैध धंदे वाढले असून गुन्हेगारीमध्ये देखील वाढ झाली असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची म्हणणे होते. त्यांनी दारूबंदी उठविण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यानंतर २०१९ ला महाविकास आघाडीची सत्ता आली आणि वडेट्टीवारांना चंद्रपूरचं पालकमंत्री पद मिळालं. त्यानंतर २७ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्यात आली. त्यावेळी विरोध देखील झाला. मात्र, मद्यपींना चांगलाच आनंद झाला होता.

उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केलेले दारू परवाने 3 ठिकाणाहून सिंगल विंडो पद्धतीचा वापर करत अत्यंत विद्युतगतीने पूर्ण केले. मद्य शौकिनांसाठी प्रतीक्षा असलेल्या या बाबीसाठी ५ जुलैला जिल्हाभरात 100 हून अधिक बार रेस्टॉरंट आणि काही दारू दुकाने सुरू झाली. चंद्रपूरच्या उत्पादन शुल्क विभागाने 490 परवानेधारकांपैकी चौकशीनंतर 98  दारू परवाने नियमित करून मान्यता प्रदान केली. अखेर ६ वर्षानंतर मद्यपींनी पुन्हा एकदा आनंद व्यक्त केला.

बार सुरू होताच चंद्रपूर-मूल मार्गावरील बार मालक गणेश होरडवार यांनी बारमध्ये चक्क वडेट्टीवारांचा फोटो लावत त्याची पूजा आणि आरती केली. 'ज्याच्यामुळे आमचे पोट भरते तेच आमचे देव. आज त्यांच्यामुळे आमचे पोटा-पाण्याचे दुकानं सुरू झाली. त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला. त्यामुळे वडेट्टीवारांनी धन्यवाद देण्यासाठी मी त्यांचा फोटो लावला असल्याचे होरडवार यांनी सांगितले.

loading image