नागपुरात निर्बंध शिथिल करा, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

devendra fadnavis
devendra fadnavise sakal

नागपूर : नागपुरातील कोरोना संसर्गाचे (coronavirus) प्रमाण आता लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. सातत्याच्या लॉकडॉऊनमुळे आधीच विविध छोटे व्यावसायिक आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झाली असल्याने आता स्थिती सुधारत असताना त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपुरात निर्बंधांमध्ये (nagpur restrictions) तातडीने शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पाठविले आहे. (devendra fadnavis wrote letter to cm uddhav thackeray for nagpur restrictions)

devendra fadnavis
अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात

राज्यातील ज्या भागात कोरोनाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि आता स्थिती बऱ्याच अंशी सुधारली आहे, तेथे लागू असलेल्या कठोर निर्बंधांबाबत फेरविचार करून त्यात तातडीने शिथिलता देण्याची गरज आहे. अर्थकारण आणि आरोग्य यात सुवर्णमध्य साधतच आपल्याला कोरोनावर मात करावी लागेल. कोरोनाविरोधातील लढाई ही एकांगी होता कामा नये. आर्थिक विवंचनेमुळे स्वत:चे जीवन संपविण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. कल्याणमध्ये व्यापाऱ्याने आत्महत्या केली, नालासोपाऱ्यात एका युवकाने जीवन संपविले, चंद्रपुरात एका भोजनालय चालकाने आत्महत्या केली. नागपूरमध्ये १७ ते २७ जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत ५९ हजार ९४८ चाचण्या झाल्यात. तर त्यात कोरोना संसर्ग आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ५८ इतकी आहे. हे प्रमाण ०.१० टक्के इतके आहे. त्यामुळे आता नागपुरात तातडीने निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

ऑगस्टपासून निर्बंध शिथिल होण्याची शक्यता -

राज्य सरकारने डेल्टा प्लसचा धोका बघता वेगवेगळ्या शहरात २८ जूनपासून निर्बंध लावले. त्यामुळे सर्व दुकाने चार वाजेपर्यंत सुरू झाली. आजही हीच स्थिती आहे. २१ जूनपासून सरकारनेच वेगवेगळ्या लेवलनुसार निर्बंध शिथिल केले होते. त्यानुसार शहरातील दुकाने आठ वाजेपर्यंत तर हॉटेल रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. २८ जूनपासून निर्बंध लावल्यानंतर शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. शहराचा पॉजिटिव्हीटी दर आता केवळ ०.१० टक्के आहे. परंतु निर्बंध कायम असल्याने व्यापाऱ्यांत असंतोष आहे. काल, सोमवारी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांचा असंतोष बघता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली. व्यापाऱ्यांचा असंतोष बघता सरकारही आता निर्बंध शिथिल करण्याच्या विचार करीत असल्याचे सुत्राने सांगितले. मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नागपुरातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात शिफारस केल्याची चर्चा व्यापारी वर्गात रंगली आहे. त्यामुळे येत्या १ ऑगस्टपासून व्यापाऱ्यांचा रोष बघता निर्बंधात शिथिलता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com