तुम्हाला मधुमेह आहे का? १५ हजार व्यक्तींची होणार चाचणी

Diabetes
Diabetes

नागपूर : लहान मुलं, तरुणवर्ग, व्ययस्क साऱ्यांनाच मधुमेह हळूहळू विळख्यात घेतो आहे. व्यसन, अरबट-चरबट खाण्यांच्या जीवनशैलीतून मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. देशात साडेसात कोटींवर मधुमेही आहेत. यातील पन्नास टक्के लोकांना आपल्याला मधुमेह आहे की, नाही हेच माहीत नाही, ही बाब लक्षात घेत २९ सप्टेंबरला एका दिवसात १० लाख व्यक्तींचे रक्त तपासून मधुमेहाची चाचणी करण्यात येणार आहे. यात नागपुरात सुमारे १५ हजार व्यक्तींची मधुमेहाची चाचणी केली जाईल, अशी माहिती हॅलो डायबेटिजचे संयोजक डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली.

रिसर्च सोसायटी फार स्टडी ऑफ डायबेटिज इन इंडिया या संस्थेच्या वतीने संलग्न संस्थांच्या पुढाकारातून रविवारी (ता. २९) दिवसभरात १० लाख व्यक्तींची मधुमेह चाचणी करण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. यात संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता या उपक्रमाची नागपूरची जबाबदारी पार पाडणार आहेत.

Diabetes
१५ वर्षीय मुलगी ५ महिन्यांची गर्भवती; प्रियकराविरुद्ध गुन्हा

शंभर दिवसांपासून ही संस्था मधुमेहींसाठी विशेष अभियान राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर शहरातील नागपूर सुधार प्रन्यासची उद्याने, रुग्णालये, औषधांची दुकानांसह विविध ठिकाणी मधुमेह चाचणी होणार आहे. यासाठी शहरात चाचणी करणारे शंभर पथक तैनात करण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेला आहार तज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता, मी टू वूई संस्थेचे चेतन मारवा उपस्थित होते.

येथे होणार निःशुल्क तपासणी

  • सुनील डायबेटिज केअर सेंटर, रामदासपेठ

  • डायबेटिच केअर फाउंडेशन, रामदासपेठ

  • संदेश दवाई बाजार, गांधीबाग

  • अनिरुद्ध रेसिडेन्सी, मानेवाडा

  • मी टू वुई फाउंडेशन

  • एनआयटी गार्डन, त्रिमूर्तीनगर

  • उदयनगर गार्डन

  • सुपर स्पेशालिटी

  • हिमालया हाईट

  • एनआयटी, एनएमसी

  • खरबी, मोमीनपुरा, हुडकेश्वर

  • ट्रस्ट सिस्टीम गायत्रीनगर,

  • मेडिकलचे मागील प्रवेशद्वार

  • यशोधरानगर चौक

  • अर्थवनगरी -२

Diabetes
नाना पटोलेंच्या नेतृत्वात निघाली भारत बंद रॅली
मधुमेहाच्या वयोमानात प्रचंड घट झाली आहे. त्यात कोरोनामुळे अनेकांच्या शरीरात साखर वाढण्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. कोरोनामुळे तरुणाई मधुमेहीच्या विळख्यात सापडत आहे. या सर्वेक्षणामुळे नागपूर शहरातील मधुमेहींची काही प्रमाणात आकडेवारी पुढे येईल.
- डॉ. सुनील गुप्ता, हॅलो डायबेटिज, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com