घरगुती वाद अन् पोलिसांची मारहाण; युवकाचा संशयास्पद मृत्यू

‘तू दारू पिऊन आहेस काय?’ अशी विचारणा पोलिसांनी केल्यानंतर त्याने होकार दिला
death
deathdeath

नागपूर : घरगुती भांडणातून (Domestic dispute) तक्रार देण्यासाठी आलेल्या युवकाचा पोलिस ठाण्यातच संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीतून (Police beating) युवकाचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रवी मोहनलाल पारधी (३८, रा. जोशी बगिच्याजवळ, कपिलनगर) असे मृत युवकाचे (youth died) नाव आहे. हे प्रकरण ‘कस्टडी डेथ’चे असल्यामुळे याची चौकशी सीआयडी करण्याची शक्यता आहे.

रवी पारधीला पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि भाऊ आहे. रवी व भाऊ हे त्यांच्या कुटुंबीयांसह एकाच घरात परंतु वेगवेगळे राहतात. रवीला दारूचे व्यसन असून, तो नळ फिटिंगचे काम करतो. सोमवारी सायंकाळी रवी हा दारूच्या नशेत घरी आला. घरी आल्यानंतर त्याने आई-वडिलांसोबत वाद घातला. त्याने आई यशोदाला मारहाण केली. त्यामुळे भावाने रवीला मारहाण केली.

death
अनुष्का सेन हिने शेअर केले बाथरूमचे फोटो; वय फक्त १९ वर्ष

रात्री ९.३० च्या सुमारास मारहाणीची तक्रार देण्यासाठी तो कपिलनगर ठाण्यात आला. त्यावेळी कपिलनगरच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) शुभांगी वानखडे, पीएसआय योगीता श्रीखंडे यांनी तक्रारदार रवी याची चौकशी केली. भावाने मारहाण केल्यामुळे तक्रार देण्यासाठी आल्याचे त्याने पीआय वानखडे यांना सांगितले.

‘तू दारू पिऊन आहेस काय?’ अशी विचारणा पोलिसांनी केल्यानंतर त्याने होकार दिला. त्यामुळे त्याला दोन कानशिलात लावल्यानंतर बीट मार्शल रवीसोबत त्याच्या घरी पोहोचले. पत्नी, आईवडील आणि भाऊ घरीच होते. त्याच्या कुटुंबीयांनी रवीनेच आईला मारहाण केली, असे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. बीट मार्शलने रवी आणि त्याच्या वडिलांसह इतरांना पोलिस ठाण्यात आणले. वडिलांनी पोलिसांना आपली तक्रार सांगितली.

death
युक्रेनच्या मुद्द्यावरून रशिया व अमेरिकेत तणाव; दिला हा इशारा

रवीची ठाण्यात आरडाओरड

पोलिस ठाण्यातच रवी आरडाओरड करीत होता. त्यामुळे पोलिस त्रस्त झाले. त्यामुळे काही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला खोलीत नेले. तेथे त्याला प्रसाद देण्यात आला. पोलिसांनी त्याच्या वडिलांची तक्रार घेतल्यानंतर बाहेर जाण्यास सांगितले. रवीला बाहेर काढण्यात आले. त्यावेळी त्याने ‘माझा डावा हात आणि छातीत दुखत असल्याचे’ पत्नीला सांगितले.

अचानक पडला बेशुद्ध

पोलिसांचा प्रसाद खाऊन बाहेर आलेला रवी पोलिस ठाण्यातच कोसळला आणि बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. पोलिसांनी त्याला पाणी पाजून पोलिस वाहनातून मेयो रुग्णालयात नेले. काही पोलिस कर्मचाऱ्यांना चांगला घाम फुटला. डॉक्टरांनी तपासणी करून रवीला मृत घोषित केले. याप्रकरणी तूर्त कपिलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com