कोरोनाच्या 'या' रुग्णांसाठी डोझी उपकरण ठरतेय प्रभावी, वाचा कसं करतंय काम?

corona
coronae sakal

नागपूर : कोविडरुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक रुग्णाला वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. अशावेळी अतिदक्षता कक्षाबाहेरील रुग्णांसाठी डोझी उपकरण उपयुक्त ठरत आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार डोझी उपकरणाच्या पूर्वचेतावणी प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. मात्र, हे डोझी उपकरण नेमकं काय आहे? ते आज आपण पाहुयात.

corona
नागपूरकरांनो सावधान! बाहेर फिरलात तर होणार कोरोना टेस्ट; १८ बाधित विलगीकरणात रवाना

काय आहे डोझी उपकरण? -

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डोझी उपकरण लावण्यात आलेले असून याद्वारे रुग्णाच्या हृदयाची गती, श्वसनदर, रक्तदाब, स्लीप एपनिया निर्देशांक, रुग्णाचा अस्वस्थता निर्देशांक तसेच ह्दयासंबंधी सर्व माहिती मिळते. हे उपकरण रुग्णाच्या गादीखाली लावण्यात येते. यामुळे रुग्णाची अस्वस्थता, रुग्णाची प्रकृती जोखमीची किंवा अतिजोखमीची आहे का, याबाबत डॉक्टरांना माहिती मिळते. या उपकरणाला वैद्यकीय भाषेत 'स्टेपडाऊन आयसीयू' म्हणतात. येथे सप्टेंबर २०२० पासून डोझी उपकरण लावण्यात आले आहे.

corona
यवतमाळच्या अभियंत्याने साकारले बहुपयोगी ‘व्हेंटीलेटर’; भारत सरकारच्या नोडल एजन्सींची मान्यता

नागपुरातील 'या' रुग्णालयात आहेत डोझी उपकरण -

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या १५०, मेडिकलमध्ये १०० तर किंग्जवे रुग्णालयात २५ डोझी उपकरण आहे. या उपकरणाद्वारे डॉक्टर दूरस्थपध्दतीने रुग्णांचे निरीक्षण करून त्यांच्यावर उपचार करु शकतात. कोरोना संसर्गाच्या काळात हे उपकरण अत्यंत उपयुक्त आहे. गंभीर टप्प्यावर असलेल्या रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी डॉक्टरांना यामुळे मदत होत आहे. यासाठी डोझी उपकरणाचा आवश्यकतेनुसार वापर करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

डोझी उपकरण कंट्रोल रुमचे उद्घाटन -

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डोझी उपकरण कंट्रोल रुमचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डोझी उपकरणाचे मुख्य संस्थापक मुदीत दंडवते, बधिरीकरण विभाग प्रमुख प्रा. डॉ. वैशाली शेलगावकर आदी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com