esakal | प्रसिद्ध युवा शिवकथाकार डॉ. सुमंत टेकाडे यांचं कोरोनामुळे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

sumant tekade

प्रसिद्ध युवा शिवकथाकार डॉ. सुमंत टेकाडे यांचं कोरोनामुळे निधन

sakal_logo
By
टीम ईसकाळ

नागपूर : प्रसिद्ध युवा शिवकथाकार डॉ. सुमंत टेकाडे यांचे शनिवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले असून ते अवघ्या ३८ वर्षांचे होते. ते शिवकालीन व्यवस्थापन पद्धतीवर अतिशय अभ्यापूर्णरितीने व्याख्यान देत होते.

हेही वाचा: आशिया खंडातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयाचं शवागार हाऊसफुल्ल

सुमंत यांचे बंगळुरूमधून व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी विप्रो कंपनीच्या ह्युमन रिसोर्स या विभागात काम केले. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन विषयात पीएचडी करून एस.बी. जैन महाविद्यालात विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. मात्र, शिवराय आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली. त्यानंतर शिवाजी महाराज आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य या विषयावर ते भाषणे देऊन समाजप्रबोधन करत होते. त्यांच्या राज्य आणि परराज्यातील अनेक कार्यक्रमांनी लक्ष वेधून घेतले होते. लवकरच त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे व लेखसंग्रहाचे प्रकाशन करण्याचा त्यांचा मानस होता. त्यातच काळाने घाव घातला व एका समाजाभिमुख व्यक्तीत्वचा अंत झाला.

हेही वाचा: १५ दिवसांत तब्बल ३४ मृत्यू! गावात स्मशान शांतता

टेकाडे हे नवयुग विद्यालयाचे माजी शिक्षक वा धरमपेठ शिक्षण संस्थेचे माजी पदाधिकारी दत्ता टेकाडे यांचे सुपुत्र होते. त्यांच्या मागे पत्नी माधवी, दोन मुले आणि आई व बराच मोठा आप्तपरीवार आहे.