esakal | राष्ट्रवादीत खळबळ : दोन सीए, एका कोळसा व्यापाऱ्यावर ईडीचा छापा
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीत खळबळ : दोन सीए, एका कोळसा व्यापाऱ्यावर ईडीचा छापा

राष्ट्रवादीत खळबळ : दोन सीए, एका कोळसा व्यापाऱ्यावर ईडीचा छापा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सक्त वसुली संचालनालयाच्या (Action of Directorate of Strict Recovery) मुंबई पथकाने बुधवारी शहरातील एक कोळसा व्यावसायिक व दोन चार्टड अकाऊंटचे कार्यालय आणि घरी छापे घातले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्याशी तिघे संबंधित असल्याचे कळते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ (Excitement in the NCP) उडाली आहे. (ED's-raid-on-two-CA-and-one-coal-trader)

कोळसा व्यावसायिक धरमपाल अग्रवाल, सीए भाविक पंजवानी, सुधीर बाहेती अशा एकूण तिघांच्या कार्यालयात बुधवारी सकाळीच सक्त वसुली संचालनालयाचे पथक दाखल झाले होते. बाहेती हे शहरातील प्रसिद्ध सीए आहेत. त्यांचे रामदासपेठ येथे कार्यालय आहे. ही कारवाई अतिशय गुप्तपणे करण्यात आली. मात्र, रात्री त्याचे वृत्त फुटले.

हेही वाचा: ब्रेकिंग : अफगाणी नागरिकाला अटक; तालिबानी आतंकवाद्यांशी संबंध

रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान, त्यांच्याकडून काही संशयास्पद व्यवहाराची कागदपत्रे त्यांनी ताब्यात घेतल्याचे समजते. त्याचा तपशील मिळू शकला नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. अनिल देशमुख यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित तीन व्यावसायिकांवर यापूर्वीसुद्धा धाडी टाकण्यात आल्या होत्या. देशमुख यांच्या घरी तपास पथक एकाच दिवशी दोनदा गेले होते. एक कॉम्प्युटरही जप्त करण्यात आला होता. अद्याप त्याचा तपशील सक्त वसूल संचालनालयाने सादर केलेला नाही.

गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी शंभर कोटी रुपयांची वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केला होता. त्यामुळे देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून सीबीआयमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शंभर कोटींचे प्रकरण असल्याने तपासासाठी सक्त वसुली संचालनालयाची मदत घेतली जात आहे.

हेही वाचा: डॉक्टरला मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन मागितली कोटीची खंडणी

व्यावसायिक रडारवर येण्याची शक्यता

या कारवाईमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंधित असलेले व्यावसायिक रडारवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्र सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप यापूर्वीच देशमुख तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

(ED's-raid-on-two-CA-and-one-coal-trader)

loading image