esakal | पुनर्विकासाच्या प्रक्रियेतही ,म्हाडाने तयार केले अडथळे
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

पुनर्विकासाच्या प्रक्रियेतही ,म्हाडाने तयार केले अडथळे

sakal_logo
By
- राजेश प्रायकर

नागपूर: म्हाडाच्या नियमानुसार गाळेधारकांनी सोसायटी तयार केली. विश्वकर्मानगरातील म्हाडाची कॉलनी जीर्ण झाली असून सोसायटीने पुनर्विकासाचा ठराव मंजूर केला. परंतु म्हाडा स्वतःच्याच नियमांना तिलांजली देत वैयक्तिक सेल डीड करून देत आहे. परिणामी संपूर्ण गाळ्यांची जागा सोसायटीच्या नावे होण्यात अडथळा निर्माण झाला. तसेच पुनर्विकास रखडण्याची शक्यता असून नागरिकांना जीर्ण गाळ्यांमध्येच राहावे लागण्याची शक्यता आहे.‘सकाळ’च्या टीमने आज विश्वकर्मानगरातील म्हाडा कॉलनीवासींसोबत संवाद साधला. येथेही म्हाडाने केलेल्या घोळामुळे सोसायटी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे.

पुनर्विकासाच्या प्रक्रियेतही म्हाडाने...

म्हाडाच्या नियमानुसार येथील गाळेधारकांनी १९९६ मध्ये सोसायटी स्थापन केली. सोसायटी मेन्टेनन्स आदीची कामे करीत आहे. परंतु येथील अनेक जुने गाळेधारक गाळे विकून दुसरीकडे गेले. गाळे घेणारे आता सोसायटीला सहकार्य करीत नाही. याबाबत सोसायटीने म्हाडाकडे तक्रारीही केल्या. मात्र म्हाडाकडून सोसायटीला कुठलेही सहकार्य मिळत नसल्याचे येथील पदाधिकाऱ्यांनी नमुद केले. त्यामुळे येथील जीर्ण झालेल्या कॉलनीच्या पुनर्विकासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: शिवसेना संपर्क प्रमुखांचे पंख छाटले; घ्यावी लागणार चौघांची संमती

म्हाडा व्यक्तिगत सेल डिड करून देत असून ते चुकीचे आहे. म्‍हाडाचे धोरण वेळोवेळी बदलत आहे. व्यक्तिगत सेल डीडमुळे सोसायटीच्या नावे कन्वेनिएंस डीड करण्यात अडथळा निर्माण होणार आहे. पर्यायाने पुनर्बांधकाम व पुनर्विकासाची कामेही रखडण्याची शक्यता आहे.

- मोरेश्वर भादे, अध्यक्ष सोसायटी.

म्हाडाच्या नियमानुसार सोसायटी स्थापन केली. परंतु अनेक नागरिक सहकार्य करीत नाहीत. सोसायटीचे सदस्यही होत नाहीत. याबाबत म्हाडाकडे तक्रार केली. परंतु म्हाडाकडून अशा नागरिकांना नोटीस आदी देण्याची गरज आहे. परंतु म्हाडा काहीच करीत नाही.

- भीमराव गाणार, स्थानिक ज्येष्ठ नागरिक व सचिव.

हेही वाचा: बालवयातच 'ती'च्या स्वप्नांचे छाटले पंख! लॉकडाउनमध्ये लहान मुलींचे गुपचूप विवाह

येथील कॉलनीतील घरे जुने झाले असून पाया मजबूत नाही. परंतु लोकांनी एकावर एक तीन मजले बांधले. एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुनर्विकासासाठी म्हाडाने, शासनाने प्रोत्साहन द्यायला हवे. आम्ही घेतलेल्या सोसायटीच्या सभेत ४२ पैकी ३७ नागरिकांनी पुनर्विकासासाठी समर्थन दिले आहे.

- बाबाराव जगदाळे, स्थानिक नागरिक.

loading image
go to top