नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिस समोर स्फोट; नाशिकवरून आले होते पार्सल

Explosion in front of General Post Office at Nagpur
Explosion in front of General Post Office at NagpurExplosion in front of General Post Office at Nagpur

नागपूर : नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिससमोर मंगळवारी (ता. १४) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास स्फोट झाला. नाशिकवरून आलेले पार्सल वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे पाठवण्यात येणार होते. हे पार्सल नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसच्या (General Post Office) पार्सल हबमध्ये पोहोचले. कर्मचारी पार्सल हाताळत असताना छोटा स्फोट (Explosion) झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. (Explosion in front of General Post Office at Nagpur)

प्राप्त माहितीनुसार, नाशिकमधील अधिकाऱ्याने वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे पाठवण्यासाठी पार्सल पाठवले होते. नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसच्या पार्सल हबमध्ये पार्सल पोहोचताच स्फोट झाला. यामुळे उपस्थित कर्मचारी घाबरले. लागलीच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सीताबर्डी पोलिस ठाण्याचे पथक व बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले.

Explosion in front of General Post Office at Nagpur
सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; चिंता आहे तर सहकार्य करा ना

पोलिसांनी तपास सुरू केला असता पार्सलमध्ये शेतावर किंवा जंगलात जनावरांना पळवण्यासाठी जे अल्प ते मध्यम प्रतीचे स्फोटक (Explosion) वापरले जातात ते असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सर्वांना सुटकेचा श्वास घेतला. पोलिसांनी स्फोटके जप्त करीत पार्सल कोणत्या उद्देशाने पाठवले होते याचा तपास सुरू केला आहे.

वीवीआयपी ठिकाणी स्फोट होणे गंभीर बाब

जनरल पोस्ट ऑफिस (General Post Office) हे सिव्हिल लाइन्स परिसरात आहे. जवळच विभागीय आयुक्त कार्यालय आणि मंत्र्यांचे बंगले असलेले रविभवन सर्किट हाउस आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा घर सुद्धा ईथेच आहे. अशा वीवीआयपी ठिकाणी स्फोट होणे नक्कीच गंभीर बाब आहे, असे पोलिस निरीक्षक अतुल सबनीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com