esakal | 'विद्यार्थी कल्याण' देणार गरजू विद्यार्थ्यांना मदत, अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur university

'विद्यार्थी कल्याण' देणार गरजू विद्यार्थ्यांना मदत, अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत ज्या विद्यार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना विभागामार्फत आर्थिक मदत करण्यात येते. या विद्यार्थ्यांना त्यासाठी अर्ज करवा लागतो. मात्र, कोरोनामुळे राज्यात टाळेबंदी असल्याने या विद्यार्थ्यांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता आले नाही. त्यामुळे आता अर्ज करण्यासाठी विद्यापीठाद्वारे मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या विद्यार्थ्यांना ३० मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

हेही वाचा: 'नागरिकांनो! RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यास पाचव्या दिवशी करा HRCT'

दरवर्षी विद्यापीठाचे विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमधील गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहायता निधीच्या माध्यमातून मदत करण्यात येते. मात्र, गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे टाळेबंदी घोषित करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया राबवून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना देण्यासाठी डॉ. अभय मुदगल यांनी पुढाकार घेतला. मात्र, गेल्या महिन्याभरापासून राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढला. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. त्यातूनच राज्यात ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन अर्ज करता येणे शक्य नाही. विशेष म्हणजे अर्ज करताना विद्यार्थ्यांना विभागप्रमुख आणि प्राचार्यांच्या स्वाक्षरी आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जावेच लागणार आहे. याशिवाय इंटरनेट कॅफेही बंद असल्याने अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणे शक्य नसल्याने बरेच विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहतील अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्‍यातच १५ मेपर्यंत टाळेबंदी वाढल्याने विद्यार्थ्यांना जाता येणे शक्य नसल्याचे दिसून येत असल्याने विभागाद्वारे ३० मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यातूनच कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ३० मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा घेतला आहे.

loading image
go to top