आणखी एका फेसबुक फ्रेंडचा युवतीवर बलात्कार; महिन्यातील पाचवी घटना

आणखी एका फेसबुक फ्रेंडचा युवतीवर बलात्कार; महिन्यातील पाचवी घटना

नागपूर : उच्चशिक्षित असलेल्या युवतीची फेसबुकवरून (Facebook) बेरोजगार युवकाशी मैत्री झाली. त्याने काही दिवस चॅटिंग केल्यानंतर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर बंद पडलेल्या कंपनीते नेऊन बलात्कार (Rape) केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. शुभम जगदीश हुड (२८, रा. दिघोरी, उमरेड रोड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरून फ्रेंडशिप झाल्यानंतर बलात्कार केल्याची महिण्यातील पाचवी घटना आहे, हे विशेष. (Facebook friend tortured a young woman)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय तरुणी रिया (काल्पनिक नाव) ही द्वीपदवीधारक आहे. ती नोकरीच्या शोधात होती. अशातच नोव्हेंबर २०१९ मध्ये तिला फेसबुकवरून शुभमची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने स्विकारली आणि दोघांची ओळख झाली. दोघेही फेसबुकवरून चॅटिंग करीत होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक देऊन व्हॉट्‍सॲपवरून चॅटिंग सुरू झाली. दोघांचे मोबाईलवरून चांगली मैत्री झाली. रिया नोकरीच्या शोधात असल्याचे शुभमने हेरले. तो तिला नोकरीबाबत फंडे देऊ लागला.

आणखी एका फेसबुक फ्रेंडचा युवतीवर बलात्कार; महिन्यातील पाचवी घटना
वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास

शुभमला तिला भेटायचे असल्यामुळे त्याने नव्याने स्थापन झालेल्या कंपनीत ओळख असून तेथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यातच शुभमने तिला वागधरा (ता. हिंगणा) येथील कोयो फिंगर फ्रेमिंग हेल्थ रिसो या कंपनी दाखवली. या कंपनीत नोकरी लावून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. शुभमने तिला कंपनी दाखवून आता ही कंपनी तयार होत असून लवकरच कामाला सुरूवात होईल असेही त्याने तिला सांगितले. त्यामुळे रियाचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याने पुन्हा तिला वागधरा गावातील एक कंपनी दाखविण्यासाठी सोबत येण्यासाठी म्हटले.

रियासुद्धा त्याच्यासोबत कंपनीत गेली. परंतु, येथील कंपनीत नेल्यानंतर त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने लग्नाचे आमिष दाखविले. बंद पडलेल्या कंपनीत शुभमने रियावर बलात्कार केला. त्यानंतर शुभम तिला वारंवार बंद पडलेल्या कंपनीत न्यायला लागला. तेथे बळजबरी तिच्याशी शारीरिक संंबंध प्रस्थापित करायला लागला. शेवटी ती कंटाळली.

आणखी एका फेसबुक फ्रेंडचा युवतीवर बलात्कार; महिन्यातील पाचवी घटना
चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

‘तुला जे करायचे आहे ते कर’

दोन वर्षे झाली तरी तिला नोकरी लावून न दिल्याने तरुणीने त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावला. त्यावर त्याने चक्क नकार देऊन लग्नास नकार दिला. त्याचप्रमाणे तिला बदनामी करण्याची धमकी दिली. ‘तुला जे करायचे आहे ते कर’ अशी धमकी दिली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून आरोपी शुभम यास अटक केली.

(Facebook friend tortured a young woman)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com