नागपूर : वीज कर्मचाऱ्यांच्या पथकावर कुटुंबाचा हल्ला

वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या पथकावर संतप्त आई मुलांनी हल्ला चढविला. लोखंडी अँगलने केलेल्या मारहाणीत महावितरणचे तांत्रिक कर्मचारी सुखदेव केराम हे रक्तबंबाळ झाले.
crime
crime

नागपूर - वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या पथकावर संतप्त आई मुलांनी हल्ला चढविला. लोखंडी अँगलने केलेल्या मारहाणीत महावितरणचे तांत्रिक कर्मचारी सुखदेव केराम हे रक्तबंबाळ झाले. काँग्रेसनगर विभागातील इंद्रप्रस्थनगरात रविवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी दाम्पत्यासह त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

क्रिष्णा वाट व त्यांची मुले अनिरुद्ध, ईशांत तिन्ही रा. अमर आशा लेआउट, इंद्रप्रस्थनगर अशी आरोपींची नावे आहेत. लॉकडाउनपासून महावितरणचे आर्थिक गणितच विस्कटले आहे. खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ जुळविण्यासाठी महावितरणने आक्रमकपणे थकबाकी वसुलीवर भर दिला आहे. थकबाकीदार ग्राहकांकडील वीजकनेक्शन कापले जात आहे. यातून सातत्याने ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उभे रहात आहेत. काँग्रेसनगर विभागांतर्गत असलेल्या यशोधरानगर, जयताळा येथील महावितरणच्या सहायक अभियंता कार्यालयात कार्यरत तंत्रज्ञ विकास राऊत, तांत्रिक कर्मचारी सुखदेव केराम, अनिल फुलझेले, आशीष आलकरी व चालक गजानन मोरे हे रवीजबिल वसुलीसाठी इंद्रप्रस्थनगरातील अमर आश ले-आउट येथे गेले होते. याच भागात वास्तव्यास असलेले ग्राहक अनिरुद्ध वाट यांना तीन दिवसांपूर्वीच थकित ५ हजार रुपये भरण्याची सूचना करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी पैसे भरण्याची तयारी दर्शविली होती.

आज पुन्हा महावितरणचे पथक घरावर आल्याचे बघून वाट कुटुंबीय चिडले. तुम्हाला आमचेच घर दिसते का असा सवाल करीत तिघेही पथकाच्या दिशेने धावून गेले. अनिल फुलझेल हे घटनेचे मोबाईलवरून चित्रिकरण करीत होते. क्रिष्णा यांनी त्यांच्या गालावर थापडा मारून चित्रिकरण बंद करण्यास सांगितले. केराम यांनी क्रिष्णा यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही थापड मारली. त्याचवेळ ईशांत हा हातात लोखंडी अँगल घेऊन आला आणि माझ्या आईला मारले, आसा आरोप करीत अँगलने मारहाण केली. यामुळे केराम रक्तबंबाळ झाले. विकास राऊत यांनी कसेबसे त्याच्या हातून लोखंडी अँगल हिसकावला. यात त्यांच्या हातालाही दुखापत झाली. घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी सोनेगाव ठाणे गाठून घटनेची तक्रार दिली. सोबतच महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी पोलिस उपायुक्त नरूल हुसेन यांच्याशी संपर्क साधून आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. घटनेचा व्हिडीओ प्रसार माध्यांवरून व्हायरल झाला. यामुळे वीज कर्मचाऱ्यांमध्येही रोष उफाळून आला. वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता संघटना संयुक्त कृती समितीने घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता.२७) दुपारी दीड वाजता विद्युतभवनासमोर द्वारसभेचे आयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com