Farmer Compensation : ही तर शेतकऱ्यांची थट्टाच; नुकसानभरपाईपोटी फक्त ४०८ रुपये

मांडवी गावातील शेतपिकांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले
Farmer Damage Compensation
Farmer Damage CompensationFarmer Damage Compensation

Farmer Damage Compensation नागपूर : शेतकऱ्यांना (Farmer) एक हजार रुपयापेक्षा कमी नुकसानभरपाई (Damage Compensation) देऊ नये, असे शासनाचे निर्देश असतानाही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना ४०० ते ७०० रुपयेच मोबदला निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये तर एक हेक्टरही क्षेत्रातील पिकांचे नुकसान दर्शविण्यात आले नाही. एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशाचीही पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेले पंचनामेच बोगस असल्याचे दिसते.

कळमेश्वर तालक्यातील मांडवा ग्रामपंचायतअंतर्गतच्या मांडवी गावातील शेतपिकांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. साडेतीनशेवर शेतकरी यात आहेत. गावातील एकाही शेतकऱ्याचे (Farmer) एक हेक्टरपेक्षा अधिकच्या क्षेत्रात नुकसान यात दाखविलेले नाही. त्यामुळे एकाही शेतकऱ्याला केंद्राच्या निकषानुसार कोरडवाहू शेतीच्या नुकसानासाठी ६८०० रुपये मिळण्याकरिता पात्र ठरविण्यात आले नाही. एवढेच नाही काही शेतकऱ्यांना तर नुकसानभरपाई फक्त ४०८ रुपये, ५४४ रुपये, ६१२ व ६८० रुपये दाखविण्यात आली.

Farmer Damage Compensation
राणा दाम्पत्यावर अटकेची टांगती तलवार? मुंबई पोलिसांनी केली ‘ही’ मागणी...

बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत कॉंग्रेस सदस्य प्रकाश खापरे यांनी हा खुलासा केला. असाच प्रकार इतरही अनेक गावांमध्ये झाला असल्याची शक्यता आहे. काही गावातील पीकच वगळण्यात आले. कुही, भिवापूर तालुक्यातील मिर्ची व इतर पिकांचे नुकसान (Damage Compensation) शून्य दाखविण्यात आल्याचा खुलासा दुधाराम सव्वालाखे यांनी केला. तर कामठी तालुक्यात फुलशेतीचे प्रंचड नुकसान झाले असतानाही त्याच्या नोंदी न करता नुकसानीच्या मदतीतून वगळल्याची माहिती अवंतिका लेकुरवाळे यांनी दिली. यामुळे प्रशाकीय यंत्रणेने केलेले पंचनामे बोगस असल्याचा आरोप होत आहे.

अनेक गावातील पंचनामेच नाही

प्रशासकीय यंत्रणेकडून ३० जुलैपर्यंत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक भागाचे पंचनामेच झाले नाही. त्यामुळे केंद्रीय पथकाला सादर केलेली माहिती सदोष असून कमी क्षेत्रात नुकसान दाखविण्यात आले. याचा फटका मदत मिळण्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Farmer Damage Compensation
Suicide attack : काबूलमध्ये आत्मघाती हल्ला; तालिबानचा रहीमुल्लाह हक्कानी ठार

चुकीचे पंचनामे करणाऱ्यांवर होणार का कारवाई?

तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या संयुक्तरित्या सर्वे करून पंचनामे करण्यात येते. त्यामुळे यांना चुकीच्या पद्धतीने हे सर्वे केल्याचे दिसून येते. त्यामुळे चुकीचे पंचनामे करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई होत की नाही, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com