esakal | आघाडीच्या कंपन्यांचा नवा फंडा; बिस्कीट, चिप्सचे पॅकेट झाले ‘नॅनो’
sakal

बोलून बातमी शोधा

आघाडीच्या कंपन्यांचा नवा फंडा; बिस्कीट, चिप्सचे पॅकेट झाले ‘नॅनो’

आघाडीच्या कंपन्यांचा नवा फंडा; बिस्कीट, चिप्सचे पॅकेट झाले ‘नॅनो’

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : इंधनासह सर्वच वस्तूंनी महागाईचे हिमशिखर गाठले आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी आघाडीच्या कंपन्यांनी नवीन युक्ती शोधून काढली आहे. पाच ते दहा रुपयांच्या पॅकेटचा आकार छोटा केला आहे. त्यामुळे पॅकेटचा आकार लहान झाला असताना किमती कायम ठेवली आहे. त्या पाकिटांची सहज विक्री सुरू असून ग्राहक मात्र, याबाबत अनभिन्न असल्याचे वास्तव पुढे आले आहे. (Fast-Food-The-packet-size-of-the-chips-is-small-Prices-remain-the-same-Business-tricks-nad86)

चिप्स, बिस्कीट, कुरकुरे, नमकीन, नुडल्स, मिक्सर, पास्ता, सॉस, केचअप आदी खाद्यपद्धार्थांच्या पाकिटांचे वजन कमी झालेले आहे. अशा प्रकारची युक्त्या कंपन्या नियमीत करीत असल्याचे बोलले जात आहे. १०० ग्रॅमचे पॅकेट ८० आणि त्यानंतर पुन्हा ७५ ग्रॅम किंवा ६० ग्रॅमचे केले आहे. ग्राहकांना मात्र, याची माहितीच नाही. एफएमसीजी कंपन्या कच्चा मालाच्या दरात वाढ झाल्याने हाी युक्ती शोधून काढली आहे.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

पाच आणि दहा रुपयांत मिळणारे चिप्स आणि कुरकुरे यांच्या वजनात कपात केली आहे. आघाडीच्या बिस्कीट कंपन्यांनीही पाच ते दहा रुपयांच्या बिस्कीटचे वजन कमी केलेत. तसेच ३० आणि ५० रुपयात मिळणाऱ्या चिप्सचे वजनही कमी केलेले आहेत. नमकीनमध्ये ४०० ग्रॅम आणि एक किलो पॅकेटच्या दरात वाढ झाली आहे.

छोट्या पॅकेटचा बाजार मोठा

चिप्स, बिस्कीट आणि नमकीनच्या छोट्या पॅकेटची मोठी बाजारपेठ आहे. लहानात लहान गावात हे उत्पादन पोहोचले आहे. पाच व दहा रुपयांच्या पॅकेटची खरेदी करणारा विशिष्ट वर्ग आहे. अशात या श्रेणीत दर वाढविण्याची जोखीम कोणतीही घेण्यास इच्छुक नसल्याने हा नवा फंडा काढला आहे. एफएमसीजी कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, वजन कायम ठेवून किंमत वाढविल्यास मागणी कमी होण्याची भीती असल्याने अशा प्रकारचा फंडा कंपन्या नियमित वापरत असतात.

(Fast-Food-The-packet-size-of-the-chips-is-small-Prices-remain-the-same-Business-tricks-nad86)

loading image