esakal | जादूटोणाच्या संशयावरून बापलेकास मारहाण; पीडित कुटुंबास संरक्षणाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

जादूटोणाच्या संशयावरून बापलेकास मारहाण; संरक्षणाची मागणी

जादूटोणाच्या संशयावरून बापलेकास मारहाण; संरक्षणाची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मौदा (जि. नागपूर) : मांगली (तेली) गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका व्यक्तीला घरातून ओढून शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आली. पोलिस वेळेवर पोहोचल्याने हल्लेखोर पसार झाले व पुढील अनर्थ टळला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. दिनेश मौदेकर असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Father-and-son-beaten-on-suspicion-of-witchcraft)

मौदेकर हे पत्नीसह शेतावरून घरी आले. तेव्हा त्यांच्या घरासमोर सत्यशीला शिवणकर व तीची जाऊ श्यामकला शिवकर, दोन पुतणे विशाल व महेश आले आणि ‘तुझा सासरा गजानन मौदेकर याने माझी मुलगी निकिता हिच्यावर जादूटोणा केला आहे’, असे दिनेश यांच्या पत्नीला म्हणाले. यावर दिनेश मौदेकर यांनी त्यांना ‘तुम्ही सिद्ध करून दाखवा किंवा आमच्याविरोधात पोलिसांत तक्रार करा’, असे म्हटले.

हेही वाचा: मित्रांनो, मी आत्महत्या करीत आहे, मृतदेह घेण्यासाठी लवकर या

परंतु, सत्यशीला शिवणकर व श्यामकला शिवणकर यांनी शिवीगाळ करून दिनेश मौदेकर, गजानन मौदेकर यांना चपलेने मारहाण केली. तसेच विशाल व महेश शिवणकर यांनी काठीने मारहाण केली. त्यामुळे मारहाणीने मौदेकर बापलेक बेशुद्ध पडले. त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमली. अंनिसचे महासचिव हरीश देशमुख यांनी मौदा पोलिसांनी घटनेची माहीती दिली. पोलिसांनी तातडीने पोहोचून जखमी बापलेकास रुग्णालयात नेले. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनात विजयसिंग ठाकूर करीत आहेत.

...तर २५ लाखांचे बक्षीस

अंधश्रद्धा निर्मूलन समिती या घटनेचा निषेध करीत आहे. दोन वर्षांअगोदरही मौदेकर परिवारावर हल्ला झाला होता. तारसा येथील एका मांत्रिकाच्या म्हणण्यानुसार हा हल्ला झाला. कोणी जादूटोणा सिद्ध करीत असेल तर त्याला २५ लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी दिले आहे.

हेही वाचा: चार दिवसांचे आश्वासन ७२ तासांतच पूर्ण; हल्लेखोर वाघ जेरबंद

मांत्रिकाच्या सांगण्यावरून जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन केले आहे. आरोपींना अटक करावी आणि पीडितांच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे.
- सुरेश झुरमुरे, कार्याध्यक्ष, अंनिस

(Father-and-son-beaten-on-suspicion-of-witchcraft)

loading image