esakal | अनैतिक संबंध : प्रेयसीच्या तक्रारीवरून विवाहित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेयसीच्या तक्रारीवरून विवाहित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेयसीच्या तक्रारीवरून विवाहित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : बायको माहेरी गेल्यानंतर शेजारी राहणाऱ्या प्रेयसीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामधून प्रेयसी चार महिन्यांची गर्भवती झाली. कुटुंबीयांच्या प्रकार लक्षात येताच मुलीने थेट विवाहित प्रियकराचे नाव सांगितले. त्यामुळे प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अमोल शामराव ठाकरे (३१, रा. पारडी) असे आरोपीचे नाव आहे. (Filed-a-case-against-a-married-lover-in-Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल ठाकरे हा भाजीपाला विकण्याचे काम करतो. त्याचे शेजारी राहणाऱ्या १९ वर्षीय युवती रिया (काल्पनिक नाव) हिच्याशी सूत जुळले होते. रियासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यावेळी रियाचे वय कमी असल्याचे सांगून लवकरच आपण लग्न करू, असे आश्‍वासन देत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्याने नातेवाईक असलेल्या युवतीशी लग्न उरकून टाकले. तरीही त्याने रियाशी अनैतिक संबंध ठेवले.

हेही वाचा: कार्तिक भटच्या तक्रारीनंतर परमबीर सिंग यांची सुनावणी पुढे ढकलली

१ डिसेंबर २०२० ते १२ एप्रिल २०२१ दरम्यान अमोलची पत्नी माहेरी गेली होती. त्याने यादरम्यान तरुणीला घरी बोलविले आणि बलात्कार केला. त्यानंतर त्याने वारंवार तिचे शारीरिक शोषण केले. रियाला दिवस गेले. ती चक्क चार महिन्यांची गर्भवती झाली. पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केल्यानंतर ही बाब आईच्या लक्षात आली.

मुलीला बाळाच्या बापाचे नाव विचारले असता तिने अमोलचे नाव सांगितले. मुलीच्या आईने अमोलला विचारणा केली असता त्याने दोघाही मायलेकीला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून आरोपी अमोल यास अटक केली.

हेही वाचा: मनपात साडेचार कोटींचा कोविड घोटाळा; आभा पांडे यांचा आरोप

रियाच्या गर्भपाताचा प्रयत्न

अमोलला काही दिवसांपूर्वीच गर्भवती असल्याची माहिती रियाने दिली होती. मात्र, त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी चार महिन्यांचा गर्भ पोटात असल्याचे सांगताच अमोल घाबरला. त्याने गर्भपाताच्या गोळ्या आणल्या आणि रियाला दिल्या. गोळ्या घेतल्यानंतर रियाची प्रकृती अचानक बिघडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

(Filed-a-case-against-a-married-lover-in-Nagpur)