esakal | निवडणुकीवर लक्ष, आयुक्त लक्ष्य! नगरसेवकांना बळ आल्याचे चित्र
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Municipal

निवडणुकीवर लक्ष, आयुक्त लक्ष्य! नगरसेवकांना आले बळ

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : पाच महिन्यांनंतर महापालिकेची निवडणूक असून, नगरसेवकांना पुन्हा उमेदवारीचे वेध लागले आहेत. निवडणुकीवर लक्ष ठेऊन त्यांनी आता नागरी समस्यांवर आक्रमक होत आयुक्तांना लक्ष्‍य करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. काही नगरसेवकांनी स्वतःच्या नावाने, मित्र परिवार नावाने फेसबुक पेज तयार केले आहे. येणाऱ्या निवडणुकीमुळे प्रत्यक्ष कृती तसेच सोशल मीडिया या दोन्ही आघाड्यांवर नगरसेवकांना बळ आल्याचे चित्र आहे.

फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणूक होणार आहे. पाच महिन्यांवर निवडणूक येऊन ठेपल्याने आता नागरी समस्या सभागृहात गाजत असल्याचे सोमवारी दिसून आले. कचरा, उद्यानाची दुर्दशा, पथदिवे, पार्किंग या क्वचितच सभागृहात येणाऱ्या विषयांवरून सदस्यांनी आयुक्तांना लक्ष्य करीत पुढील सर्वच सभागृहात नागरिकांच्या समस्यांवरून आक्रमक होण्याचे संकेत दिले. आतापर्यंत अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून कामे करून घेणारे नगरसेवकही आता सभागृहात विषय मांडून आक्रमकतेचे दर्शन घडवित आहेत तर काही प्रभागातील जुनी रखडलेले कामे, प्रकल्पावरून प्रशासनाला जाब विचारत आहे.

हेही वाचा: सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

प्रभाग ३० मधील कचरा संकलन केंद्रामुळे होणाऱ्या दुर्गंधीवरून नागेश सहारे हे सोमवारी प्रथमच सभागृहात आक्रमक झाले. त्यांनी थेट आयुक्त राधाकृष्णन बी. यांना परिसरात एक महिना निवास करून बघा, असे आव्हान दिले. महिनाभरापूर्वी आयुक्तांना याबाबत तक्रार केल्यानंतर काय केले, असा सवाल त्यांनी थेट आयुक्तांनाच केला. मात्र, आयुक्तांनी खेळीमेळीने हो मी येतोय, असे सांगून सहारे यांच्या आक्रमकतेची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला.

माजी महापौर संदीप जोशी अनेक महिन्यांनंतर सोमवारी त्यांच्या प्रभागातील वीर सावरकर उद्यानाच्या दुर्दशेवरून आक्रमक दिसून आले. त्यांनी मनपा निवडणूक न लढण्याचा निर्धार केला असला तरी उद्यानाची समस्या त्यांनी लावून धरली. आभा पांडे, जितेंद्र घोडेस्वार हे नेहमीच सभागृह गाजवत असतात. त्यांनीही पार्किंग व पथदिव्यांच्या मुद्द्यांवरून प्रशासनावर तोंडसुख घेतले.

हेही वाचा: चुलत जावांचा शॉक लागून मृत्यू; भेटीसाठी गेली अन् गमावला जीव

गेली चार वर्षे सभागृहाचे कामकाजाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आता राजेंद्र सोनकुसरे यांनीही प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. एकूणच काही नगरसेवक आता बोलते झाले असून पुढील पाच महिन्यांत पाच सर्वसाधारण सभेत आणखी नगरसेवकांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंठ फुटण्याची शक्यता आहे.

बोलण्याच्या धडपडीत अज्ञानही उघड

तांत्रिकदृष्ट्या बसपाचे नगरसेवक मोहम्मद जमाल यांनी सुरू झालेल्या शाळांमध्ये लसीकरणाचा एकच डोस घेतलेल्या शिक्षकांना प्रवेश नसल्याचा सभागृहात उपस्थित केला. एखाद्या शिक्षकाने प्रकृतीच्या कारणावरून डोस घेतला नसेल तर त्यालाही प्रवेश नसल्याचे सांगितले. महापौरांनी प्रेमाने त्यांना समजावून सांगितले की मनपाने कोरोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या प्रत्येकालाच दोन्ही डोस दिले. एखाद्याने घेतला नसेल तर त्याचे कारण काय? परंतु मनपा शाळेतील प्रत्येकच शिक्षकाने डोज घेतला नसेल तर त्याचा दोष आहे. त्यामुळे हा सभागृहात चर्चेचा विषयच नाही, असे नमूद करीत जमाल यांचा मुद्दा फेटाळून लावला.

loading image
go to top