आता वनविभागाचाही स्वतंत्र ‘बॅण्ड’ व वन्यगीत

राज्याच्या वनविभागाकडून निसर्ग, वन्यप्रेमींसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन
forest department has separate band and forest song open competition nature and wildlife lovers
forest department has separate band and forest song open competition nature and wildlife loversSakal

नागपूर : संरक्षण दल, पोलिस विभागाचा स्वतंत्र बॅन्ड असतो. या पार्श्वभूमीवर आता वनगीताचीही रचना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या या विभागाने स्वत:ची सिग्नेचर वनगीत आणि बॅन्ड निर्मिती करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

वन्यजीव आणि वन संरक्षणात लोकांचा सहभाग वाढावा, या हेतूने महाराष्ट्र वनविभागातर्फे सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून वनविभागाने जंगलप्रेमी, निसर्गप्रेमींसाठी अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजा बढे लिखित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताची गेल्या महिन्यात निवड करण्यात आली. अनेक ठिकाणी पोलिसांसह विविध विभागाचा स्वतंत्र बॅन्ड असतो. या पार्श्वभूमीवर आता वनगीताचीही रचना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

शासनाच्या या विभागाने स्वत:चे सिग्नेचर वनगीत आणि बॅन्डनिर्मिती करण्याचे निश्चित केले आहे. विविध प्रसंगी प्रोत्साहन देण्याकरिता, प्रारंभ करण्यासाठी ते वाजवता येऊ शकेल. तसेच जे वनविभागाला कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर एक वेगळी ओळख मिळवून देण्यास सक्षम ठरेल, असे गीत निवडण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यगीत जाहीर झाल्यानंतर आता वनविभागानेही आपले गीत तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

वनविभागाकडून शाळकरी मुलांसाठी पर्यावरण समस्येबाबत व सध्यास्थितीबाबत विविध उपक्रमांद्वारे माहिती देणे, पर्यावरण संरक्षणाच्या व संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामांमध्ये सहभागी करून घेणे, यासाठी इको क्लब म्हणजेच हरित सेना हा उपक्रम राबविला जातो.

या इको क्लबसाठीही युवा, ज्येष्ठ आणि सामान्य नागरिकांच्या माध्यमातून प्रेरणादायी ठरेल, असे गाणे आणि प्रतिज्ञाही तयार करण्यात येणार आहे. यासाठी एका ऑनलाइन स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून, ३० एप्रिलपर्यंत याबाबतच्या प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.

यासाठी घेण्यात येणार स्पर्धा

वनगीताचे बोल, संगीतासह इको क्लबसाठी गाणे, फॉरेस्ट बॅन्डसाठी संगीत आणि इको क्लबसाठी प्रतिज्ञा या चार घटकांसाठी खुली स्पर्धा वनविभागाने आयोजित केली आहे. प्रत्येक श्रेणीतील गुणानुक्रमे पहिल्या तीन नोंदींना आकर्षक पारितोषिक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com