विदर्भात उष्माघात अनेकांच्या जिवावर, नागपुरात चार जणांचा बळी

Summer Season
Summer Seasonesakal
Summary

नागपुरात गेल्या पाच दिवसांपासून पारा 45 अंशांच्या वर आहे.

नागपूर : विदर्भातील (Vidarbha) उन्हाच्या लाटेनं जाता-जाता बुधवारी शहरात चार बळी घेतले. सक्करदरा, इमामवाडा, अजनी आणि सदर परिसरात चार अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी (Police) वर्तविलीय.

सक्करदरा परिसरातील ताज दर्ग्याजवळ अंदाजे ४५ वर्षांचा व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आल्यानंतर त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला. इमामवाडा परिसरातील दुसऱ्या घटनेत बैद्यनाथ चौकातील एमएसईबी ऑफिसच्या मागे ३० वर्षीय पुरुष बेशुद्धावस्थेत आढळला. याशिवाय सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छावणी बसस्टॉपजवळ अंदाजे ४५ वर्षांची महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली.

Summer Season
कोरोनानंतर आता 'मंकीपॉक्स'चा धोका वाढला; WHO कडून मोठा इशारा

चौथा मृत्यू अजनी पोलिस ठाण्याच्या (Ajni Police Station) हद्दीत मेडिकल परिसरात झाला. येथील मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक ८२ जवळ अंदाजे ३७ वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत सापडली. त्याला आकस्मिक विभागात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. चारही जणांचा मृत्यू उन्हाच्या तडाख्यामुळं झाल्याची शक्यता पोलिस व डॉक्टरांनी वर्तविलीय.

Summer Season
पैगंबर मोहम्मद प्रकरण भोवलं; भाजपच्या नुपूर शर्मांसह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपुरात गेल्या पाच दिवसांपासून पारा ४५ अंशांच्या वर आहे. आज त्यात अंशतः घट अवश्य झाली. मात्र, उन्हाचे चटके कायम होते. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रम्हपुरी येथे ४६.२ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागानं (Meteorological Department) गुरुवारपासून विदर्भात मॉन्सूनपूर्व पावसाचा इशारा (यलो अलर्ट) दिल्याने उन्हाची लाट कमी होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com