esakal | शेतकऱ्यांसाठी महाविकासआघाडी सरकारने काहीच केले नाही : चंद्रशेखर बावनकुळे
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrasekhar Bavankule

शेतकऱ्यांसाठी आघाडीने काहीच केले नाही : चंद्रशेखर बावनकुळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या एकाही शेतकऱ्यांना महाविकासआघाडीने मदत केली नाही. त्यामुळे महाविकासआघाडीच्या बंदमध्ये शेतकरी आणि नागरिक सहभागी झाले नसल्याचा आरोप भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

आघाडी सरकारने मावळ येथे शेतकऱ्यांवर गोळीबार, अतिवृष्टी, पुरामुळे अतोनात नुकसान झाल्यानंतरही मदत केली नाही. ४५ लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले. यापूर्वी संत्री, मोसंबीचे नुकसान होताच तत्कालीन फडणवीस सरकारने तातडीने ५५ कोटींची मदत केली होती. २५ हजार रुपये नुकसान भरपाईचे आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही. पीक विमा रद्द केला, असेही ते म्हणाले.

विधिमंडळाचे अधिवेशन टाळणाऱ्या राज्य सरकारला बंदचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल करून बावनकुळे म्हणाले, दोन वर्षांच्या काळात कोणतीच मदत केलेली नाही. विकासाला चालना देणारे वैधानिक विकास मंडळ बंद केले. बंदचे आवाहन करणारे महाआघाडीतील एका पक्षाचे नेते सीबीआयच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आंदोलनात व्यस्त होते. शेतकऱ्यांच्या विरोधात नाही तर, सरकारच्या ढोंगीपणा स्पष्ट करण्यासाठी सांगण्याची भूमिका असल्याचे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा: नुसता दुधाचा चहा पिताय? जाणून घ्या होणारे नुकसान

पैसा वापरून विजय मिळवण्याचा प्रयत्न

जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाकडे लक्ष वेधले असता, सत्ता व पैशाला अमाप वापर करून विजय मिळवण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, प्रवक्ते चंदन गोस्वामी उपस्थित होते.

loading image
go to top