कचरा संकलनासाठी घराघरांवर क्यूआर कोड; प्रथमच नवी प्रणाली

कचरा संकलनासाठी घराघरांवर क्यूआर कोड; प्रथमच नवी प्रणाली

नागपूर : घरापर्यंत कचरागाडी येत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या. यावर उपाय म्हणून महापालिकेने घराघरांवर क्यूआर कोड स्टिकर लावण्याचा प्रयोग धरमपेठ झोनमध्ये सुरू केला. क्यूआर कोडच्या माध्यमातून कुठल्या घरातून कचरा उचलला अथवा नाही, याबाबत माहिती मिळणार असल्याचा दावा बग्स फ्री सोलुशन कंपनीने केला आहे. धरमपेठ झोनमध्ये प्रयोग यशस्वी झाल्यास शहरात हीच प्रणाली वापरण्यात येणार आहे. ही प्रणाली सुरू करणारे नागपूर राज्यातील पहिले शहर ठरणार आहे.

नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर शहरात स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. रविनगर अमरावती रोड येथील मरारटोली आणि पीॲण्डटी कॉलनीतील दहा घरांमध्ये हे क्यूआर कोड स्टिकर लावण्यात आले आहे. कचरा संकलन करणारा कर्मचारी या कोडवर मोबाईल द्वारे स्कॅन करेल आणि वजन करून कचरा घेईल. या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरातून ठराविक वेळेत कचरा उचलला जाईल.

कचरा संकलनासाठी घराघरांवर क्यूआर कोड; प्रथमच नवी प्रणाली
भंडारा : तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी; आढळले मेडिकल वेस्ट

गुरुवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी या दहा घरांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला. बग्स फ्री सोलुशन कंपनीतर्फे दहा घरात प्रयोगिक तत्त्वावर क्यू आर कोड स्टिकर लावण्यात आले आहे. महापौरांच्या उपस्थितीत कचरा गाडी तिथे आली, स्वच्छता कर्मचारी यांनी घरात लावलेले क्यू आर कोड स्कॅन करून कचरा घेतला आणि त्याचे वजन करून कचरा गाडीमध्ये टाकला. याप्रसंगी महापौरांनी संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली.

या व्यवस्थेमध्ये स्वच्छतादूताने कचरा उचलला अथवा नाही, याची माहिती मनपालाही मिळेल, असे बग्स फ्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक दिग्विजय येनूरकर यांनी सांगितले. यावेळी स्वच्छता विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, झोनल अधिकारी दिनदयाल टेंभेकर, कंपनीचे विशाल कोठारी, श्रीधर, कार्तिक ओझा आणि हिरेन पाठक उपस्थित होते.

मनुष्यबळ कुठून आणणार?

ही प्रक्रिया उत्तम असली तरी यासाठी अधिक मनुष्यबळ लागणार आहे. सद्यःस्थितीत एक कचरा गाडी आठ तासांत तीन फेऱ्या करीत जवळपास नऊशे घरांतील कचरा संकलन करीत आहे. परंतु क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी कचरागाडीवरील कर्मचाऱ्याला पाच ते सात मिनिटांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे कचरा संकलन करण्यात येणाऱ्या घरांची संख्या कमी होणार आहे. परंतु या प्रणालीच्या यशस्वितेसाठी मनुष्यबळ वाढवावे लागणार आहे. ते कुठून आणणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कचरा संकलनासाठी घराघरांवर क्यूआर कोड; प्रथमच नवी प्रणाली
नागपूर : आगीत आठ गॅरेजची राख; काछीपुरावासींचे जागरण
घरोघरी कचरा संकलन करणारे स्वच्छतादूत वेळेवर येत नाही, अशी नगरसेवक आणि नागरिकांची तक्रार होती. त्यांच्या वेळासुद्धा निश्चित नसतात. कचरा संकलन करणारे स्वच्छतादूत ज्या घरातील कचरा घेईल त्याचा घर क्रमांक, घरमालकाचे नाव संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त होईल. एका झोनमध्ये हा प्रयोग सुरू करण्यात आला. संपूर्ण शहरातही लागू करण्यात येईल.
- दयाशंकर तिवारी, महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com