नागपूर : आमच्या जमातीचा कागुद द्या; गोंड वस्तीची मागणी

गोंड वस्तीची एकमुखी मागणी : हिस्टरीपासून सर्वच डॉक्युमेंट उपलब्ध
Give the paper of our tribe demand for Gond vasti nagpur
Give the paper of our tribe demand for Gond vasti nagpur sakal

नागपूर : आदिवासी समजाची गोंड वस्ती. साऱ्यांजवळ आधार कॉर्ड आहे. आदिवासी समाजाची सारी हिस्टरी असलेल्या ‘गोंडव वस्ती’ अनेकांजवळ जातीचे दाखले नाहीत. येथील काही मुलांनी शिक्षणाची वाट धरली, मात्र आदिवासी जमातीचे ‘डॉक्युमेंट’ अर्थात जातीचा दाखला नाही. यामुळे शिक्षणात या मुलांना कोणत्याही सवलती मिळत नाही...येथील तरूण मंडळी ‘मायबाप सरकारसमोर जोहार करण्यास तयार आहेत, आमच्या आदिवासी जमातीचे आमाले कागुद द्या... अशी एकमुखी मागणी गोंड वस्तीने केली आहे.

आदिवासी समाज जंगलात राहात होता, जंगलातून बाहेर आला. समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी हा समाज आसुसला आहे. स्वातंत्र्यानंतर सारे काही आलबेल होईल, असे चित्र दिसलं, परंतु गोंड वस्तीचे विदारक रुप समाजाला बघायला मिळत आहे. येथे दगडांचे रस्ते आहेत, विजेचे खांब गोंड वस्तीतील नागरिकांनी विकत घेतले. यामुळे किमान रस्त्यावर विद्युत दिवे असतात. पाण्यासाठी नळ नाही, हातपंपाच्या भरवशावरच गोंड वस्तीची तहान भागते. चार दोन लेकरं शिक्षण घेत आहेत, परंतु या वस्तीत एकाच्याही घरी संगणक नाही, संगणक म्हणजे काय? हे केवळ दोन मुलांना माहित आहे.

एकही तरुण नोकरीत नाही

गोंड वस्तीत हजार लोकवस्ती आहे. मात्र एकही तरुण किंवा तरुणी सरकारी सोडा, परंतु खासगी कार्यालयातही कामाला नाही. सारे जगण्यासाठी खायचे आणि खायचे मिळवण्यासाठी मोलमजुरी, दगड फोडण्यापासून तर खड्डे खोदण्याचे काम करायचे याच आयुष्याच्या चक्रव्युहात ‘गोंड वस्ती अडकलेली आहे. या वस्तीतील मुलांजवळ आदिवासी जमातीचा दाखला नाही, तसेच आर्थिक स्थिती नसल्यामुळे त्यांचे आयुष्य म्हणजे यातनांची यात्रा आहे.

गोंड वस्तीत कोणाजवळ आधार कार्ड आहे, कोणाजवळ निवडणूक कार्ड आहेत. काहींजवळ जातीचे दाखलेही आहेत. मात्र आता शिकणाऱ्या मुलांजवळ जातीचे प्रमाणपत्र नाहीत. आम्हाले जातीचा दाखल देण्यासाठी आमच्या गोंड वस्तीत एक कॅम्प लावावा.

- तुफान उईके, गोंड वस्ती, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com