गोंदिया : अर्धनग्न अवस्थेत जंगलात आढळला युवतीचा मृतदेह

चेहरा पूर्णपणे जळाल्याने तिची ओळख पटू शकली नाही.
woman
womansakal

आमगाव जि. गोंदिया: कुंभारटोली येथील जंगल परिसरात एका अनोळखी युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना गुरुवारी (ता. २१) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. मारेकऱ्यांनी युवतीवर अत्याचार करून तिची दगडाने हत्या केली असावी, असा अंदाज असून नंतर तिच्याच सलवारने तिचा चेहरा जाळल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

कुंभारटोली येथील काही नागरिक लगतच्या जंगल परिसरातील महादेव पहाडीकडे सरपण वेचण्यासाठी तर काही जण मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांच्यापैकी काही जणांना चेहरा जळत असलेला युवतीचा मृतदेह दिसला. याची माहिती त्यांनी आमगाव पोलिसांना दिली. पोलिस उपनिरिक्षक दिलीप कन्नमवार यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. ही युवती अंदाजे २० ते २१ वर्षे वयोगटातील असून, चेहरा पूर्णपणे जळाल्याने तिची ओळख पटू शकली नाही.

मारेकऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केला असल्याचेही घटनास्थळावरून लक्षात येते. अत्याचारानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली असावी, असा अंदाज असून नंतर तिच्याच कपड्याने चेहरा जाळल्याचेही दिसून येते. ही तरुणी कुठली आहे. तिची हत्या का करण्यात आली? याचा उलगडा अद्याप झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com