Exclusive : अखेर रणजीत सफेलकरची शैक्षणिक संस्थांवरून हकालपट्टी

ranjeet safelkar
ranjeet safelkarcanva

नागपूर : निरक्षर असलेल्या कुख्यात गुंड रणजित सफेलकर तीन शिक्षण संस्थाकडून चालविण्यात येणाऱ्या सात शाळांचा अध्यक्ष होता. त्याने धमकी देऊन शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यक्षपद बळावल्याची शक्यता आहे. या संदर्भात 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर संस्थांनी ठराव मंजूर करून सफेलकरची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गुंड मनीष श्रीवास हत्याकांडात गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या रणजित सफेलकरविरुद्ध पोलिसांनी बरेच पुरावे गोळा केले आहे. पोलिसांकडून रणजितच्या संपत्तीचा लेखाजेखा तयार करण्यात येत आहे. शिक्षण संस्थांवर सफेलकर अध्यक्ष असल्याचे वृत्त प्रकाशित होताच पोलिसांनी संस्थांना पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले. शिवाय सफेलकरने कुणाला धमकावून वेतनातील पैसे मागितले का, याची विचारणा केली असता संस्थांनी पत्राला उत्तर देताना त्याला संस्था अध्यक्ष पदावरून हटवल्याची माहिती सादर केली, अशी माहिती पोलिस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी दिली. तिसरी नापास असलेल्या रणजितने थेट शैक्षणिक संस्थांच्या अध्यक्षपदी झेप घेतली होती. त्याने गुन्हेगारीतून कमवलेला पैसा शैक्षणिक संस्थांमध्ये गुंतविल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - कुख्यात गुंडाच्या तब्बल सात शाळा, गुन्हेगारीच्या पैशातून उघडल्या शिक्षण संस्था

इशाक म्हस्केचाही होता 'गेम'

मनीष श्रीवासचा खून करताना सोबत असलेला ईशाक मस्ते हा कधीतरी पोलिसांसमोर तोंड उघडेल याची सफेलकरला भीती होती. त्यामुळे सफेलकर ईशाकला एक लाख रुपये महिना देत होता. पोलिसांनी मनीष श्रीवास हत्याकांडाची फाइल पुन्हा उघडली, त्यावेळी ईशाक मस्तेचाही गेम करण्याचा कट रणजितने रचला होता.

हेही वाचा - 'कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांनी कोरोना चाचणी करावी'

आणखी एका आरोपीला -

मनीष श्रीवास हत्याकांडात गुन्हे शाखा पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. विनय ऊर्फ गोलू द्वारकाप्रसाद बाथव (वय ४२, रा. हंसापुरी) याला अटक करण्यात आली. त्याचा विशाल पैसाडेलीच्या खुनातही सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com