नागपूर : आरटीईमध्ये ग्रामपंचायत समितीचा गडबड घोटाळा

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तपासणीत खुलासा
RTE School
RTE SchoolGoogle

नागपूर : जिल्हापरिषदेच्या कार्यकारी अधिकारी यांच्याकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांना पंचायत समितीद्वारे प्रवेशासाठी दिलेल्या प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यात चौकशीअंती गट पंचायत समितीचे सरपंचासह अध्यक्ष, सचिव व समितीचे सदस्यांनी प्रवेशात गडबड केल्याची माहिती समोर आली आहे.

आष्टी येथील भारतीय विद्या भवन येथे प्रवेशासाठी काही पालकांनी आष्टी बोरगाव येथील सरपंच रवींद्र ढोले आणि येरला येथील सरपंच माया ठाकरे यांच्याकडून बोगस रहिवासी दाखला घेतल्याची माहिती समोर आली होती. यावेळी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी आरटीई ॲक्शन समितीचे अध्यक्ष शाहिद शरीफ यांनी केली होती.

मात्र, समितीने ही मागणी फेटाळून लावल्याने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावरुन त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्याची चौकशी समिती लावून कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी पालक प्रफुल्ल पडोळे, तनिषा प्रमोद भोयर हे या परिसरातील रहिवासी नसल्याची बाब समोर आली. याबाबत तक्रार केल्याने त्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांची समिती चौकशीसाठी नेमण्यात आली. त्यातून समितीने गट पंचायत समितीचे सरपंचासह अध्यक्ष, सचिव व समितीचे सदस्यांनी प्रवेशात गडबड केल्याचा ठपका ठेवल्याचे समजते.

रहिवासी नसताना दिले प्रमाणपत्र

संबंधित पालक रहिवासी नसताना सरपंचांनी त्यांना रहिवासी प्रमाणपत्र देत, त्याद्वारे त्यांनी प्रवेश मिळविल्याचे सिद्ध झाले. विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे गेल्यावर तपासणीत पालक या पत्त्यावर वास्तव्यास नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या प्रवेशाला राखून ठेवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com