मुद्रांक शुल्क ऑनलाइन कसे भरावे?

stamp duty
stamp dutye sakal

नागपूर : कोरोना (coronavirus) काळात मुद्रांक शुल्क (stamp duty) भरण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाणे शक्य नसते. त्यामुळे मुद्रांक शुल्क ऑनलाइन (online stamp duty) भरणे हे सोयीस्कर ठरते. तसेच नागरिकांनी मुद्रांक शुल्क हा ऑनलाइनच भरावा, असेही आवाहन केले जाते. मात्र, ते ऑनलाइन कसे भरावे? याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. (how to pay stamp duty online)

stamp duty
पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; 'हे' तीन मुद्दे गाजणार

मुद्रांक शुल्क म्हणजे काय? -

मालमत्ता खरेदी किंवा विक्रीचा प्रत्येक व्यवहार यशस्वी करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. यापूर्वी, खरेदीदारांनी मालमत्ता नोंदणीसाठी सब-रजिस्ट्रार कार्यालयात स्वतः जाऊन ते देय भरावे लागत होते. मात्र, आता ते ऑनलाइन भरले जाऊ शकते. या ऑनलाइन मुद्रांक शुल्कामुळे अनेक समस्या सुटू शकतात.

मुद्रांक शुल्क कसे भरता येईल?

मुद्रांक शुल्क भरण्याच्या तीन पद्धती आहेत.

  • ई-पेमेंट

  • परंपरागत मुद्रांक कागद (stamp paper)व चिकट मुद्रांक (adhesive stamps)

  • फ्रँकीग

ई-पेमेंट -

महाराष्ट्र शासनाच्या ग्रास (GRAS)या प्रणालीमध्ये सहभागी बँकेत नेटबँकीग असलेले खाते पाहिजे. त्याद्वारे घरबसल्या इंटरनेट बँकीग सुविधेच्या माध्यमातून तुम्ही ई पेमेंट करू शकता. या ग्रास प्राणालीमध्ये बँकांची यादी www.igrmaharashtra. gov.in या संकेतस्थळावर किंवा https://gras.mahakosh. gov.in या संकेतस्थळावर मिळेल.

परंपरागत मुद्रांक (छापील मुद्रांक)-

मुद्रांक कार्यालय, सर्व जिल्हा कोषागार व सर्व उपकोषागार कार्यालये आणि परवाना धारक मुद्रांक विक्रेते

फ्रँकींग -

परवानाधारक फ्रँकींग विक्रेता यादी नोंदणी मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तिथे जाऊन तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येईल.

मुद्रांक शुल्क भरताना काय काळजी घ्यावी? -

दस्तऐवज करणा-या पक्षकारांपैकी कोणत्याही पक्षकाराच्या नावानेच मुद्रांक खरेदी करावा. वकील अथवा ति-हाईत इसमाचे नावाने मुद्रांक खरेदी करt नये, तसे केल्यास असा दस्तऐवज अमुद्रांकित (not duly stamped) आहे, असे समजले जाते. ज्या व्यक्तीने मुद्रांक शुल्कासाठी खर्च केला आहे, त्याच्याच नावे मुद्रांक खरेदी करावा. जेणेकरुन परतावा मागण्याचा प्रश्न आल्यास इतर लोकांच्या सहीची आवश्यकता राहणार नाही. परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याव्यतीरिक्त इतर व्यक्तीकडून मुद्रांक खरेदी करू नयेत. तसेच त्यांनी जादा पैशांची मागणी केल्यास संबंधित सहदुय्यम निबंधक कार्यालयास तक्रार द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com