नागपूर : पत्नीसह मुलीचा चिरला गळा... पतीने स्वत:लाही लावला गळफास

एमआयडीसी पोलीस ठाण्यअंतर्गत हा प्रकार झाला आहे.
नागपूर हादरलं! पत्नीसह मुलीची हत्या, आरोपीची आत्महत्या
नागपूर हादरलं! पत्नीसह मुलीची हत्या, आरोपीची आत्महत्या

नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत राजीव नगर येथे एक व्यक्तीने पत्नी आणि मुलीचा गळा चिरला. यानंतर त्याने स्वत गळफास घेत आयुष्य संपवलंय. राजीव नगर, तरोडा मोहल्ला परिसरातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

विलास चंपतराव गवते असे या व्यक्तीचे नाव असून त्याने दोघींचाही गळा चिरला. मृत व्यक्तीने १३ वर्षांच्या मुलीला देखील संपवलं. यासोबत पत्नी रंजनाची (वय 45) हत्या केली. यानंतर विलासने स्वत गळफास घेतला. (सविस्तर वृत्त लवकरच...)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com