शाळांसमोर आव्हान! नागपूरमध्ये 50 टक्केच विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती

Online Education
Online EducationOnline Education
Summary

कोरोनामुळे टाळेबंदी घोषित करण्यात आली. त्यामुळे शाळा संपूर्णतः बंद करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय देण्यात आला.

नागपूर : विदर्भात २८ जूनपासून नव्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ ऑनलाइन (Online) पद्धतीने होणार आहे. १ ली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ ऑनलाइन अभ्यासक्रम (Online courses) शिकविला जाणार आहे. मात्र, असे असले तरी आत्तापर्यंत शाळांमार्फत शिकविल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात व शहरी भागात ५० टक्केच विद्यार्थ्यांची (50 per cent students) ऑनलाइन वर्गात उपस्थिती असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यायचे कसे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. (in nagpur, only 50 per cent students attend online classes)

Online Education
...तर तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देऊ: माजीमंत्री संजय कुटे

कोरोनामुळे टाळेबंदी घोषित करण्यात आली. त्यामुळे शाळा संपूर्णतः बंद करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय देण्यात आला. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांकडे ॲन्ड्राइड फोनची गरज असल्याने अनेक गरीब विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित राहावे लागल्याची बाब समोर आली. त्यामुळे ग्रामीण भागात याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले. नेटवर्क नसल्याने अनेक विद्यार्थी या शिक्षणापासून दूर गेलेत. याशिवाय शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांचीही जवळपास हीच परिस्थिती दिसून आली. त्यात शहरी भागात केवळ ५० टक्के मुलेच ऑनलाइन वर्गात उपस्थिती लावतात.

Online Education
निवडणूक कार्यक्रम : १९ जुलैला नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक

विद्यार्थ्यांना शिकविला जाणार अभ्यासक्रम केवळ ३० टक्केपर्यंतच समजत असल्याचे शिक्षकांचे मत आहे. यामुळे ऑनलाइन शिक्षणामध्ये सुधारणा करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. शाळांमध्ये सरकारने ऑनलाइन शिक्षण देता यावे. यासाठी शिक्षकांसाठी सोयी निर्माण करण्याबाबत कोणत्याही सूचना केलेल्या नसल्याने शिक्षकांमध्येही ऑनलाइन शाळेबाबत फारशी उत्सुकता दिसून येत नाही. दुसरीकडे खासगी शाळाही विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी वसूल करीत असताना सरकारने ऑनलाइनसाठी सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी अपेक्षा करीत आहेत.

Online Education
नागपूर ते बुटीबोरी हा रस्ता सहापदरी करणार

शाळांमध्ये सुविधांचा अभाव

सरकारने ऑनलाइन शिक्षण देण्याचे व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षकांना दिले असले तरी बऱ्याच ग्रामीण आणि शहरी शाळांमध्ये शिक्षकांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. शाळेतील शिक्षक, व्हॉट्सअॅप, झूम, गुगल मीट यासारख्या अॅपचा वापर करून शिकवितात. मात्र, त्यातून फारसे शिकवले जात नाही. यासाठी शाळेमध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी सोयी-सुविधा निर्माण करून देण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक करीत आहेत.

Online Education
खुशखबर! नागपूर विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

३० टक्केच कळतो अभ्यासक्रम

शहरी भागात केवळ ५० टक्के मुलेच ऑनलाइन वर्गात उपस्थिती लावतात. विद्यार्थ्यांना शिकविला जाणार अभ्यासक्रम केवळ ३० टक्केपर्यंतच समजत असल्याचे शिक्षकांचे मत आहे. कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याने एखादा विद्यार्थी केव्हा बाहेर पडेल याचा नेम नसतो. त्यामुळे बराच वेळ विद्यार्थ्यांना कनेक्ट करणे आणि त्यानंतर समजवण्यात जात असल्याने शिक्षक सांगतात.(in nagpur, only 50 per cent students attend online classes)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com