

Nagpur News
sakal
कामठी : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गालगत खैरी शिवारातील घनदाट जंगलात सुमारे ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा प्रकार हत्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.