ट्रक अंगावर उलटल्याने कामगार जागीच ठार, परिसरात तणावाचे वातावरण

accident
accidente sakal

हिंगणघाट (जि. वर्धा) : भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन पलटल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेला गीमाटेक्‍स कंपनीचा कामगार जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील वणी येथील गिमाटेक्‍स या टेक्‍स्टाईल कंपनीसमोर घडली. यानंतर गिमाटेक्‍स कंपनीसमोर तणावाचे वातावरण तयार झाले होते. मिल व्यवस्थापन आणि कामगार नेते यांच्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोर चर्चा होऊन पाच लाखांचा धनादेश कामगारांच्या कुटुंबाला प्रदान करण्यात आला. यानंतर तणाव निवळला.

accident
वॉरियर आजी! तीन वेळा झाली कोरोनाची लागण; दमा, बीपी असूनही केली मात

आकाश मोरेश्वर मून (वय 28 ) रा. हिंगणघाट, असे मृत कामगाराचे नाव आहे. तो गीमाटेक्‍स कंपनीचा कामगार असून रात्र पाळी आटोपून घरी जाण्यासाठी सकाळी सात वाजतादरम्यान कंपनीसमोर रस्त्याच्या कडेला उभा होता. तेवढ्यात हैदराबादकडून नागपूरच्या दिशेने जात असलेला ट्रक क्रमांक यू. पी. 94-टी 6194 च्या चालकाचा गिमाटेक्‍स कंपनीसमोर ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाला. यात रस्त्याच्या कडेला उभा असलेला आकाश मून ट्रकखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रक चालक ट्रक सोडून तेथून पसार झाला. घटनेनंतर कंपनी समोर तणावाचे वातावरण तयार झाले. मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी कामगारांनी या मृत कामगाराचे पार्थिव कंपनीच्या प्रवेशद्वार समोर नेऊन ठेवले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण, पोलिस कर्मचारी नितीन राजपूत, अजहर खान, प्रदीप राठोड घटनास्थळी आले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.

accident
तीन तुरुंग अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, कैद्यालाच मागितली एक लाखाची खंडणी

पाच लाखांची मदत -

कामगारांच्या कुटुंबीयांना गीमाटेक्‍स कंपनीकडून आर्थिक मदत मिळावी, ही भूमिका कामगार व नेत्यांनी घेतली. या विषयावर कामगार नेते आणि मिल व्यवस्थापन यांच्यात उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या समोर बैठक झाली. कामगारांच्या वतीने आमदार कुणावार, सभापती ऍड. सुधीर कोठारी, राजू तिमांडे, आफताब खान यांनी सहभाग घेतला तर मिलव्यवस्थापनच्या वतीने मॅनेजर शाकीर खा पठाण यांनी भाग घेतला. यावेळी तहसीलदार श्रीराम मुंधडा, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण उपस्थित होते. चर्चेच्या दोन फेरी झाल्यानंतर मिल व्यवस्थापन आणि कामगार नेते यांच्यात एकवाक्‍यता होऊन उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या हस्ते मृत कामगाराच्या भावाच्या हातात पाच लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com