शिवसेनेतून हकालपट्‌टी करण्यात आलेला मंगेश कडवची मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Land Mafiya Mangesh Kadav sent to Central Jail
Land Mafiya Mangesh Kadav sent to Central Jail

नागपूरः दुकान विक्रीच्या नावावर बिल्डर देवा शिर्केची 18 लाख रूपयांनी फसवणूक केल्या प्रकरणात शिवसेनेतून हकालपट्‌टी करण्यात आलेला शहरप्रमुख मंगेश कडवची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. गुन्हे शाखेने त्याला आज न्यायालयात उपस्थित केले होते. मंगेशला सोमवारी हुडकेश्‍वरमध्ये केलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी अटक करण्यात येणार आहे. आतापर्यंत त्याच्यावर सलग आठ गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्ष फंडाच्या नावावर व्यापारी, दुकानदार, सावकार आणि सुपारी व्यावसायिकांकडून महिन्याकाठी 50 लाख रूपये खंडणी वसुल करणारा माजी शहरप्रमुख मंगेश कडव याने देवानंद शिर्के (रघुजीनगर) यांची 18 लाखांनी फसवणूक केली होती. 30 जूनला मंगेश कडववर पहिला गुन्हा दाखल झाला होता. मंगेशने बिल्डर देवा शिर्के यांना नोव्हेंबर 2013 मध्ये एक दुकान विकले होते. 21.50 लाख रूपयांमध्ये सौदा झाला होता. देवा यांनी मंगेशला चेक आणि नगदी स्वरूपात एकूण 18 लाख रूपये दिले होते.

हेही वाचा - "त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...

साडेतीन लाख रूपये रजिस्ट्रीच्या वेळी देण्याचे ठरले होते. मात्र, या कालावधीत मंगेशने तेच दुकान बॅंकेकडे 50 लाखमध्ये गहाण ठेवले. फसवणूक झाल्यामुळे शिर्के यांनी मंगेशविरूद्ध तक्रार दिली. तक्रारीनंतर मंगेशवर गुन्हा दाखल झाला. त्याला 9 जुलैला अटक करण्यात आली. त्याला तब्बल 10 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. त्याची आता न्यायालयाने कारागृहात रवानगी केली.

सोमवारी मंगेशला कारागृहातून प्रॉडक्‍शन वारंटवर गुन्हे शाखा आणखी एकदा अटक करणार आहे. मंगेशसह त्याची डॉक्‍टर पत्नी रुचिका हिलाही एका फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखेने अटक केली तर बजाजनगर पोलिस ठाण्यात डॉ. रुचिकावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

संपादन - अनिल यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com