फोटो द्या नाहीतर मतदानाला मुकाल! 'ही' आहे शेवटची तारीख

Voter List
Voter ListSakal

नागपूर : जिल्हा परिषद (nagpur zp election) व पंचायत समित्यांच्या पोट निवडणुकीचे मतदान १९ जुलैला होणार आहे, तर मतदारयादीत (voting list) छायाचित्र नसलेल्यांचे नाव वगळण्यात येणार आहे. छायाचित्र सादर करण्यासाठी १५ जुलै शेवटची संधी आहे. सध्या शेतीचा हंगाम असून मतदार शेत कामात व्यस्त आहेत. दिलेल्या वेळेत छायाचित्र देणे शक्य नाही. त्यामुळे हजारो मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. (last date to give photo for voter id)

Voter List
बंडखोरी होण्याच्या भीतीने उमेदवारांची नावे गुलदस्त्यात, भाजपला धास्ती

जिल्ह्यात बारा विधानसभा मतदार संघ आहेत. यात एकूण ४२ लाख ३० हजार ३८८ मतदार आहेत. यापैकी तब्बल २ लाख ४६ हजार ९६० एवढ्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाहीत. सध्या मतदार यादी दुरुस्त करण्याची मोहीम सुरू आहे. याअंतर्गत यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी आपले रंगीत छायाचित्र संबंधित कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. ही मोहिमेची मुदत १५ जुलैपर्यंत वाढविली आहे. आपण स्थलांतरित झाला आहात, असे गृहीत धरून आपली नावे मतदार यादीतून वगळण्याचा धोका आहे. छायाचित्र नसलेल्यांची नावे निवडणूक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत.

येथे जमा करा छायाचित्र -

  • मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)

  • मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय

मतदार संख्या -

एकूण मतदार : ४२,३०,३८८

छायाचित्र नसलेले २,४६,९६०

विधानसभानिहाय

मतदारसंघ एकूण मतदार छायाचित्र नसलेले

  • काटोल २६८,८२७ ३५१४

  • सावनेर ३,१३,२०७ ३२६५

  • हिंगणा ३,९२,८५४ ११,२२७

  • उमरेड २,८९,४५८ १३६०

  • कामठी ४,५०,७९६ २९,६५६

  • रामटेक २,७४,०५९ ३,६५८

  • दक्षिण-पश्चिम नागपूर ३,८५,१८४ २०,१६१

  • दक्षिण नागपूर ३,७८,७४३ ३६,५९०

  • पूर्व नागपूर ३,८२,१५७ ३३,३४८

  • मध्य नागपूर ३,३१,१०५ २८,९५९

  • पश्चिम नागपूर ३,६८,२६४ २८,२९३

  • उत्तर नागपूर ३,९५,७३४ ३६,९२९

अनेक मतदारांचे नाव यादीत असून त्यांच्याकडे ओळखपत्र नाही. आयोगाकडून मान्यता दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे मतदान करीत आहे. ओळखपत्र नसलेल्यांना त्यांचे छायाचित्र आहे की नाही, ही ऑनलाइन बघण्याची सुविधा नाही. त्यामुळे अशा मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभाग किंवा विधानसभा मतदार संघातील निवडणूक कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी.
-मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com