नागपूर : मध्यप्रदेशात ‘मुसळधारे’मुळे निम्म्या शहराचे पाणी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur water supply stop

नागपूर : मध्यप्रदेशात ‘मुसळधारे’मुळे निम्म्या शहराचे पाणी बंद

नागपूर : मध्यप्रदेशातील मुसळधार पावसामुळे तोतलाडोह धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नवेगाव खैरी धरणाचे सर्व १६ दरवाजे खुले करण्यात आले असून संपूर्ण पाणी कन्हान नदीत सोडण्यात आले. परिणामी कन्हान नदीला पूर आला असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कन्हान येथील कच्च्या पाण्याच्या विहिरी गाळाने तुंबल्या आहेत. परिणामी आशीनगर, सतरंजीपुरा, नेरूनगर आणि लकडगंज झोनमधील वस्‍त्यांचा पाणीपुरवठा प्रभावित झाला असून उद्या, बुधवारीही बंद राहणार आहे.

मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने तोतलाडोह धरण तुडूंब भरले. येथील पाणी सोडण्यात आले असून ते नवेगाव खैरी धरणात जमा झाले. नवेगाव खैरी जलाशय क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने येथील सर्व १६ दरवाजे उघडे करण्यात आले. पुढील ४८ तास हे दरवाजे उघडे राहणार आहेत. त्यामुळे कन्हान नदीला पूर आला. परिणामी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या कच्च्या पाण्याच्या विहीरीत गाळ जमा झाला आहे.

या गाळात जाणे स्कूबा डायव्हर्ससाठीही मोठे आव्हान आहे. त्यामुळे कन्हान येथील पाण्याचे पंपिंग आज पहाटे बंद करण्यात आले. परिणामी शहराच्या उत्तर, पूर्व व दक्षिण नागपुरातील काही वस्त्यांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. उद्याही आशीनगर, सतरंजीपुरा, नेरूनगर आणि लकडगंज झोनमधील वस्त्यांत पाणीपुरवठा होणार नाही. जलसंधारण विभागानुसार कन्हान नदीच्या पाण्याची पातळी आज उशिरा रात्रीपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. परंतु उद्यापर्यंत पाणी मिळणे कठीण आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Web Title: Madhya Pradesh Heavy Rain Nagpur Water Supply Stop Kanhan River Flood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..