परीक्षा रद्द झाल्यानंतर शुभेच्छा देणारी जाहिरात

सार्वजनिक आरोग्य विभागाने लेखी परीक्षा घेण्याचे काम एका खासगी संस्थेला दिले होते. मात्र, परीक्षा घेण्यात ही संस्था नापास झाली
परीक्षा रद्द झाल्यानंतर शुभेच्छा देणारी जाहिरात
परीक्षा रद्द झाल्यानंतर शुभेच्छा देणारी जाहिरात

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क आणि गट-ड मधील पदभरतीमध्ये ६ हजार २०५ जागांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला परीक्षा घेण्याचे निश्चित झाले. अनेकांच्या परीक्षा बाहेरगावी दिलेल्या केंद्रावर असल्याने सर्व उमेदवार त्या-त्या शहरात पोचले. अचानक परीक्षा रद्द करण्यात आली. यामुळे परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला. त्यात दुसऱ्या दिवशी परीक्षांर्थीना शुभेच्छा देणारी जाहिरात प्रकाशित करण्यात आल्याने पुन्हा परीक्षार्थी भडकले. अधिकाऱ्यांनी शुभेच्छा देणारी जाहिरात रद्द करण्याची गरज होती, मात्र विभागाने परीक्षार्थीच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याच्या प्रतिक्रिया उमेदवारांमध्ये उमटल्या आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाने लेखी परीक्षा घेण्याचे काम एका खासगी संस्थेला दिले होते. मात्र, परीक्षा घेण्यात ही संस्था नापास झाली. शनिवार आणि रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलली. आरोग्य मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र शासनातर्फे परीक्षार्थींचे परीक्षा देताना मनोबल उंचावण्यासाठी शुभेच्छा देणारी जाहिरात या दरम्यान प्रकाशित करण्याचे नियोजन केले होते. मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द झाली. यामुळे आधीच भडकलेले परीक्षार्थी परीक्षा रद्द झाल्यानंतर शुभेच्छा देणारी ही जाहिरात बघून भडकले. पॅरामेडिकल स्टुडंट वेल्फेअर ॲण्ड अॅल्युम्नी असोशिएशनचे अध्यक्ष अक्षय गायधने यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

परीक्षा रद्द झाल्यानंतर शुभेच्छा देणारी जाहिरात
मुंबई: ईडीच्या कारवाईदरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसणार होते. परीक्षार्थींना शुभेच्छा देणारी जाहिरात देण्याचा शासनाचा हेतू चांगला होता, परंतु परीक्षा रद्द झाल्याचे मंत्र्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांनाच कळले होते. यामुळे प्रसिद्धी विभागाने ही शुभेच्छा देणारी जाहिरात रद्द करण्याची गरज होती. यामुळे आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा दिसून येतो. दोषींवर कारवाई करावी.

- अक्षय गायधने, अध्यक्ष-पॅरामेडिकल स्टुडंट वेल्फेअर ॲण्ड अॅल्युम्नी असोशिएशन, महाराष्ट्र राज्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com