नागपूर : दहावीच्या निकालात मुलीच टॉपर

प्राजक्ता भुडे, श्रावणी कुकडे, सोनिया देशमुख, राणू दुर्गे टॉप
SSC Result
SSC Resultesakal

नागपूर : दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर राज्यात मुलींनी बाजी मारली असून शहरातही मुलीच टॉपर ठरल्या आहेत. पंडित बच्छराज व्यास विद्यालयाची विद्यार्थिनी प्राजक्ता भुडे हिने ९८.८० टक्के गुण मिळवून सर्वोत्तम कामगिरी केली. यापाठोपाठ टाटा पारसी शाळेची श्रावणी कुकडे हिने ९८.६० टक्क्यासह दुसरे स्थान पटकाविले.

निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये धाव घेतली. निकालामध्ये यंदाही मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ही मुलांच्या तुलनेत अधिक आहे. तर अनेक शाळांमधूनही पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचा टक्का सर्वाधिक असल्याने दिसून आले. नागपूर जिल्ह्यातून एकूण ५८ हजार १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलांचा टक्का ९७.१८ तर मुलींचा टक्का ९८.७२ आहे. विशेष म्हणजे निकालात मूकबधिर विद्यार्थ्यांमधून शंकरनगर मूकबधिर शाळेची विद्यार्थिनी सोनिया देशमुख ८४ टक्के गुणांसह अव्वल आली. याशिवाय रात्रशाळेतून पंचशील नगर नाईट स्कूलची विद्यार्थिनी राणू दुर्गे हिने सर्वाधिक ७४ टक्के गुण मिळवले आहेत. जयताळा मराठी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी प्रगती मेश्राम हिने ९२.६० टक्के गुण मिळवून महापालिका शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com