फिरायला जाणे जीवावर बेतले, नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

nikhil tumsare
nikhil tumsaree sakal

सावनेर (जि. नागपूर) : जिल्ह्यातील कन्हान नदी पात्रावरील (kanhan river saoner) कोच्छी डॅमच्या (kochhi dam) पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून निखिल दिलीपराव तुमसरे (२२)असे मृताचे नाव आहे. (man died by drowning in river at saoner of nagpur)

nikhil tumsare
लॉकडाउनच्या काळातही शस्त्रक्रिया; एप्रिलपासून २८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया

निखिल हा जुडो कराटेचा प्रशिक्षणार्थी असून तो सावनेरमधील सटवा माता परिसरातील रहिवासी होता. तो आठ ते नऊ मित्रांसोबत रविवारी तालुक्यातील खापा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नदीवरील कोच्छी जलप्रकल्प परिसरात पिकनिकला गेला होता. येथील पाण्यात निखिल व त्याचे तीन मित्र पोहायला गेले. निखिल पाण्यात बुडाल्याचे बघून इतर मित्र बाहेर निघाले. मात्र, निखिलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मासोळी पकडण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी पोलिसांच्या सूचनेवरून मृतदेहाचा शोध घेतला. काही काळानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर सावनेर येथील शवविच्छेदन केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास खापा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com